लोकप्रतिनिधींनी परिस्थिती समजून घेण्याची गरज --स्टाफ कमी, रुग्ण जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 10:45 AM2020-04-18T10:45:27+5:302020-04-18T10:48:28+5:30

पूर्वी महिन्याला ३० ते ३५ प्रसूतीचे रुग्ण येत होते. आता १०० ते १३० रुग्ण येत आहेत. मात्र, पुरेसा स्टाफ अद्यापही नसल्यामुळे कार्यरत असणाºया कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे गैरसमजुतीतून डॉक्टर, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये वादाचे प्रकार समोर येत आहे.

'Savitribai Flowers Stress on Health System | लोकप्रतिनिधींनी परिस्थिती समजून घेण्याची गरज --स्टाफ कमी, रुग्ण जास्त

लोकप्रतिनिधींनी परिस्थिती समजून घेण्याची गरज --स्टाफ कमी, रुग्ण जास्त

googlenewsNext
ठळक मुद्दे: रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक; ‘सावित्रीबाई फुलेमध्ये आरोग्य यंत्रणेवर ताण

कोल्हापूर : ‘मनुष्यबळ कमी आणि रुग्ण जास्त’ अशा स्थितीमुळे सावित्रीबाई फुले रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. परिणामी कार्यरत असणाऱ्यांवर अतिरिक्त काम करण्याची वेळ येत असून, वादाचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही वस्तुस्थितीची माहिती घेणे गरजचे आहे. रिक्त पदे भरल्यास आणखी चांगली सुविधा देणे शक्य होणार असून, यासाठी त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

सावित्रीबाई फुले रुग्णालय गोरगरिबांचा आधारवड आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे आधुनिक साधनसामग्री, अतिदक्षता विभाग सुरू केला आहे. तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेची सुविधाही सुरू असल्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. पूर्वी महिन्याला ३० ते ३५ प्रसूतीचे रुग्ण येत होते. आता १०० ते १३० रुग्ण येत आहेत. मात्र, पुरेसा स्टाफ अद्यापही नसल्यामुळे कार्यरत असणाºया कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे गैरसमजुतीतून डॉक्टर, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये वादाचे प्रकार समोर येत आहे.

कोरोना विषाणूमुळे सीपीआर रुग्णालय काही दिवस केवळ कोरोनासाठी म्हणून स्वतंत्र रुग्णालय केले होते. या दरम्यान, सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये प्रसूतीच्या रुग्णांची संख्या वाढली. आरोग्य यंत्रणेवर ताण पडला. परिणामी दोन दिवसांपूर्वी गैरसमजुतीतून लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांमध्ये वादाचा प्रकार घडला. पुरेसा स्टाफ नसेल तर सुविधा देणार कशी, ही दुसरी बाजूही लोकप्रतिनिधींनी समजून घेणे गरजेचे आहे.

कमी पगारामुळे डॉक्टरांच्या जागा रिक्त
इतर ठिकाणी जादा पगार मिळत असल्यामुळे सावित्रीबाई फुले येथे डॉक्टर येण्याकडे पाठ फिरवितात; तर सध्या काही डॉक्टर सामाजिक बांधीलकी म्हणून येथे सेवा देत आहेत, हेही वास्तव आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत विनाकारण वाद घालणे चुकीचे आहे.


एका डॉक्टरांवर चार विभागांची जबाबदारी
रात्रीच्या वेळी अपघात विभाग, प्रसूती विभाग, वॉर्ड आणि अतिदक्षता विभाग अशा चार विभागांची जबाबदारी एकाच डॉक्टरवर असते. वास्तविक एका शिफ्टमध्ये तीन डॉक्टर असणे आवश्यक आहे. हीच परिस्थिती इतर कर्मचाºयांचीही आहे. त्यामुळे उपलब्ध स्टाफवर अतिरिक्त ताण पडतो. त्यातून रुग्ण आणि स्टाफमध्ये किरकोळ वादावादी होते.

 

  • प्रसूती विभागातील वस्तुस्थिती

पद मंजूर पदे कार्यरत रिक्त पदे
डॉक्टर १३ ८ ५
भूलतज्ज्ञ ५ २ ३

Web Title: 'Savitribai Flowers Stress on Health System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.