‘शाहू’वर चटकदार कुस्त्या
By admin | Published: August 7, 2016 12:54 AM2016-08-07T00:54:06+5:302016-08-07T00:58:34+5:30
शौकिनांची गर्दी : अक्षय पाटील, डोंगळे, भोसले, गायकवाड दुसऱ्या फेरीत
कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सुरू असलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत शनिवारी दुसऱ्या दिवशी चटकदार कुस्त्या झाल्या. सचिन पाटील (सावर्डे बुद्रुक), अक्षय पाटील (दिंडनेर्ली), प्रवीण डोंगळे (बानगे), शुभम भोसले (गोरंबे), अक्षय गायकवाड (दऱ्याचे वडगाव), शुभम पाटील (बेलवळे) यांनी अनुक्रमे ६५ किलो आणि ६० किलो ज्युनिअर गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
३० किलो वजन गटात निवास पाटील (हादनाळ), महादेव माने (बानगे), विजय चौगुले (नंदगाव), ३२ किलो वजन गटात तेजर माळवी (बानगे), प्रणव बराले (कळंबा), श्रेयस गाडगीळ (पाचगाव) यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश करीत चटकदार कुस्त्या करीत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे. कारखाना कार्यस्थळावर सुरू असलेल्या या स्पर्धा पाहण्यासाठी कुस्तीशौकीन तसेच पैलवानांची गर्दी झाली आहे.
स्पर्धेचे हे ३२वे वर्ष आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पै. राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या कुस्ती स्पर्धेसाठी बाजीराव पाटील, रामा माने, संभाजी मगदूम, आनंदा गायकवाड, अशोक फराकटे, मलकारी पुजारी, शंकर मेडशिंगे, सर्जेराव मोरे, रंगराव हरणे हे काम पाहात आहेत, तर या स्पर्धेचे संयोजक अजित कुलकर्णी, रमेश सणगर, बाळासोा तिवारी, सर्जेराव पाटील, शौकत जमादार, रावसाहेब परीट, संजय भगवे, शामराव शेळके, भैरवनाथ आरेकर, राजेंद्र सावेकर, आण्णासोा गाडेकर, आदी काम पाहात आहेत. (प्रतिनिधी)