दानोळीतील वनराईचा उपक्रम आदर्शवत : सयाजी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:42+5:302021-06-23T04:17:42+5:30
दानोळी (ता. शिरोळ) येथील पालवी फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या वनराईस सिनेअभिनेते शिंदे यांनी भेट दिली. ते म्हणाले, तुम्ही करत ...
दानोळी (ता. शिरोळ) येथील पालवी फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या वनराईस सिनेअभिनेते शिंदे यांनी भेट दिली.
ते म्हणाले, तुम्ही करत असलेल्या कामाचा लाभ पुढील कित्येक पिढ्यांना होणार आहे. सध्या जी नैसर्गिक आॅक्सिजनची कमतरता भासत आहे, अशावेळी वृक्षांचे महत्व समजते. एक झाड मनुष्यासाठी खूप काही देते. आपणही वृक्षांचे व निसगार्चे काही देणे लागतो. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण कसे होईल व त्यांची वाढ कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
सिनेअभिनेते सागर कारंडे म्हणाले, दानोळीतील युवकांनी केलेले काम खूप मोठे आहे. याचे चित्र तेथे चार ते पाच वर्षात तुम्हाला दिसेलच. यातील एकही झाड विदेशी नाही. त्यामुळे भरपूर प्रमाणात नैसर्गिक आॅक्सिजन तयार होणार आहे. स्वागत महादेव धनवडे यांनी केले. यावेळी सचिन चंदाने, रावसाहेब भिलवडे, सतीश मलमे, गुंडू दळवी, राजू खिलारे, नितीन लंबे, संजय धनवडे, सचिन लंबे, जगदीश लंबे, विजय दळवी, अमित दळवी, दशरथ सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - २२०६२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - दानोळी (ता. शिरोळ) येथे वनराईस भेटीप्रसंगी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महादेव धनवडे, सिनेअभिनेते सागर कारंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.