सय्यद यांची रिक्षा लई भारी

By admin | Published: January 29, 2015 12:29 AM2015-01-29T00:29:43+5:302015-01-29T00:32:38+5:30

सौंदर्य स्पर्धा : नवीन गटात अजित आवटी यांची रिक्षा ठरली सरस

Sayyed's autorickshaw was heavy | सय्यद यांची रिक्षा लई भारी

सय्यद यांची रिक्षा लई भारी

Next

कोल्हापूर : निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळाच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत ‘रिक्षा सुंदरी’चा मान सातारच्या मुस्ताक वसीम सय्यद (रिक्षा क्र. एम.टी.क्यू ७६७७) यांच्या रिक्षाने पटकावला, तर नवीन गटातील ‘रिक्षा सुंदरी’ स्पर्धेत सांगलीच्या अजित आवटी (एम.एच.१०-के४२२०) यांच्या रिक्षाने मान पटकावला.
स्पर्धेचा निकाल असा : नवीन गट - अजित आवटी (रा. सांगली)- रिक्षा क्रमांक एम.एच.१० के ४२२० (प्रथम), सिद्धार्थ कांबळे (कोल्हापूर) - एम.एच.०९ जे. ७६४२ (द्वितीय), अनिकेत पोवार (कोल्हापूर)- एम.एच.०९.जे ७७७५ (तृतीय), राजेंद्र शिंदे (कोल्हापूर)- एम.एच. जे. ०९-७४१९ (उत्तेजनार्थ)
जुना गट : मुस्ताक वसीम सय्यद -पेंटर (सातारा) - एम.टी.क्यू ७६७७ (प्रथम), युनूस मुनेर मौलवी (कदमवाडी)- एम.एच.०७-२३५० (द्वितीय), रमेश सकट (कोल्हापूर)-एम.एच.०९-जे५२४४ (तृतीय), रामचंद्र चव्हाण (पीरवाडी, कोल्हापूर)- एम.एच.०९- जे. ६४८२ (उत्तेजनार्थ )
संपूर्ण स्पर्धेमध्ये ‘उठावदार रिक्षा सुंदरी’चा पुरस्कार एम.टी.क्यू ७६७७ या मुस्ताक सय्यद यांच्या रिक्षाने चांदीचे मेडल व मानाचा फेटा मिळविला.
यानिमित्त प्रामाणिक रिक्षाचालक रमेश अर्जुनगी (रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर), सचिन कापूसकर (रा. फुलेवाडी) यांचा व मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार राजेश क्षीरसागर, वाहतूक निरीक्षक श्रीनिवास मूर्ती, नीलेश कदम, किशोर घाटगे, सुनील टिपुगडे, नंदकुमार वेठे, किरण पडवळ, चंद्रकांत भोसले, रिक्षाचालक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव, सतीश पाटील आदींच्या उपस्थित झाला.


कोल्हापुरातील निवृत्ती चौक मित्र मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेतील जुन्या गटातील विजेते डावीकडून मुस्ताक वसीम सय्यद-पेंटर (सातारा), युुनूस मुनेर मौलवी, रमेश सकट, रामचंद्र चव्हाण.

Web Title: Sayyed's autorickshaw was heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.