स.ब. खाडे महाविद्यालयास बीएससी, एम.ए., एम कॉम या विद्याशाखांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:38+5:302021-06-26T04:17:38+5:30

विद्याशाखांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी आमदार प्रा. जयंत आसगावकर आणि प्राचार्य डॉ.डी.डी. ...

S.B. Permission for Khade College for B.Sc., M.A., M.Com | स.ब. खाडे महाविद्यालयास बीएससी, एम.ए., एम कॉम या विद्याशाखांना परवानगी

स.ब. खाडे महाविद्यालयास बीएससी, एम.ए., एम कॉम या विद्याशाखांना परवानगी

Next

विद्याशाखांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी आमदार प्रा. जयंत आसगावकर आणि प्राचार्य डॉ.डी.डी. कुरळपकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी आ.प्रा. आसगावकर यांनी स.ब. खाडे महाविद्यालयाची स्थापना १९८५ मध्ये झाल्याचे सांगून त्यावेळी संस्थेला शासनाने या महाविद्यालयात कला वाणिज्य आणि शास्त्र या विद्याशाखांना परवानगी दिली होती. मात्र काही तांत्रिक व आर्थिक अडचणीमुळे शास्त्र शाखा सुरू करता आली नाही. परिणामी परिसरातील विद्यार्थी आणि विशेष करून विद्यार्थिनींची गैरसोय होत होती. त्यामुळे परिसरातील पालकांची स.ब. खाडे महाविद्यालयात शास्त्र आणि पदव्युत्तर वर्ग सुरू करण्याची मागणी होत होती.

या नवीन विद्याशाखांच्या मान्यतेसाठी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत,कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी बीसीयूडी संचालक प्राचार्य डॉ.डी.आर. मोरे, संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, उपाध्यक्ष के. ना. जाधव, सर्व संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे सहकार्य लाभले.

फोटो --

सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव व शिक्षक आ. प्रा. जयंत आसगावकर

Web Title: S.B. Permission for Khade College for B.Sc., M.A., M.Com

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.