टंचाईच्या ‘कळा’ उद्यापासून

By admin | Published: March 31, 2016 12:35 AM2016-03-31T00:35:15+5:302016-03-31T00:36:13+5:30

शहरात दिवसाआड पाणीपुरवठा : जूनपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान; महापालिकेचे नियोजन

The scarcity 'keys' will start from tomorrow | टंचाईच्या ‘कळा’ उद्यापासून

टंचाईच्या ‘कळा’ उद्यापासून

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला प्रथमच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत, म्हणूनच उद्या, शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणी येणार याचेही नियोजन जाहीर केले आहे.
शहरातील पाच लाख ६० हजार लोकसंख्येस दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका पंचगंगा व भोगावती नदीतून रोज १२० दशलक्ष लिटर इतका पाणी उपसा करते. तथापि, यावर्षी राधानगरी व काळम्मावाडी धरणांमध्ये कोल्हापूरच्या वाट्याचा एकूण ४.५० टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी जूनपर्यंत पुरविण्याचे नियोजन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने धरणातून सोडलेले पाणी महापालिकेच्या शिंगणापूर बंधाऱ्यामध्ये साठते. हेच पाणी पाटबंधारे विभाग पुन्हा नव्याने पाणी सोडण्याच्या रोटेशनपर्यंत पुरविणे आवश्यक आहे, म्हणून महापालिकेने दैनंदिन पाणी उपसा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सम व विषम तारखेनुसार एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे.
- मनीष पवार, जल अभियंता


शिंगणापूर योजना
गट - १ : १ एप्रिल : ए व बी वॉर्डमधील शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा होणारा साळोखेनगर ते शेंडा पार्क, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, संभाजीनगर, देवकर पाणंद, जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी परिसर.
गट -२ : २ एप्रिल : ई वॉर्डमधील शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा होणारा सर्व संलग्न भाग, त्यामध्ये प्रामुख्याने राजारामपुरी परिसर, कावळा नाका, आदी.


बालिंगा योजना (चंबूखडी)
गट - १ : १ एप्रिल : फुलेवाडी ते सबजेल व्हॉल्व्हपर्यंतचा ए, बी, सी व डी वॉर्डमधील भाग. रिंगरोडमधील आपटेनगर पंपिंग (जुने)पर्यंतचा शहरी भाग, सानेगुरुजी वसाहत, मोहिते कॉलनी, क्रशर चौक, तुळजाभवानी कॉलनी, आपटेनगर ते रंकाळापर्यंतचा रोडच्या दोन्ही बाजूचा परिसर.
गट-२ : २ एप्रिल : सबजेल व्हॉल्व्ह ते शाहूपुरीपर्यंतचा ए, बी, सी, डी व ई वॉर्डांतील भाग, रिंगरोड परिसर ग्रामीण भाग तसेच गंधर्वनगरी ते ए वन गॅरेजपर्यंतचा भाग, कणेरकर नगर परिसर.


बावडा फिल्टर (पूरक यो.)
गट-१ : १ एप्रिल : डीएसपी चौक ते शुगर मिलपर्यंत कसबा बावडा परिसर, लाईन बझार, कदमवाडी, भोसलेवाडी, कनाननगर, विचारेमाळ, शाहूपुरी, बापट कॅम्प, जाधववाडी, टेंबलाई टाकी ते संलग्न परिसर, सदर बाजार.
गट-२ : २ एप्रिल : डीएसपी चौक ते वॉटरपार्क, खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत बावडा रोड पूर्व व पश्चिमेकडील संलग्न परिसर, रमणमळा, ताराबाई टाकीवरील सर्व संलग्न भाग, कावळा नाका टाकीवरील मार्केट यार्डपर्यंतचा परिसर, कोल्हापूर-सांगली रोड उत्तरेकडील व दक्षिणेकडील सर्व संलग्न भाग, स्टेशन रोड.

Web Title: The scarcity 'keys' will start from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.