कोरे आयटीआयमध्ये शिष्यवृत्ती योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:31+5:302021-09-06T04:27:31+5:30
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे आयटीआय प्रवेश सत्र २०२१पासून या संस्थेत इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती ...
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे आयटीआय प्रवेश सत्र २०२१पासून या संस्थेत इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू असल्याची माहिती प्राचार्य बी. आय. कुंभार यांनी दिली.
तात्यासाहेब कोरे आयटीआय या संस्थेमध्ये वेगवेगळ्या व्यवसायांच्या एकूण १७ बॅचेसचे प्रशिक्षण वारणा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे व प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमप्रकारे सुरू आहे आतापर्यंत संस्थेचा निकाल १०० टक्के इतका लागत असून, अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय यशस्वीरित्या उभे केले आहेत. नोव्हेंबर २०२०मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वारणा साखर कारखाना, बिल्ट्यूब इंडिया लिमिटेड, वारणा दूध संघ अशा विविध संस्थांसह नामवंत कंपन्यांमध्ये एकूण ४८ विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी मिळवून यांनी दिली. वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संधीचा फायदा घेऊन व्यवसाय शिक्षणामध्ये आपले करिअर घडवावे, असे आवाहन व्यवस्थापनामार्फत करण्यात आले आहे.