कोविडमध्ये पालकत्व हरविलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:27 AM2021-08-19T04:27:21+5:302021-08-19T04:27:21+5:30

अध्यक्ष पाटील म्हणाले, श्री दत्त सह. साखर कारखाना ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम शेतकऱ्यांसमोर आणले जात आहेत. शेतीतील विविध ...

Scholarships for students who have lost parenthood in Kovid | कोविडमध्ये पालकत्व हरविलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

कोविडमध्ये पालकत्व हरविलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Next

अध्यक्ष पाटील म्हणाले, श्री दत्त सह. साखर कारखाना ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम शेतकऱ्यांसमोर आणले जात आहेत. शेतीतील विविध वैज्ञानिक प्रयोग राबवून शेतकऱ्यांचे राहणीमान आर्थिक उत्कर्षातून वाढविण्याबरोबर संपूर्ण भागातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार मेळावे घेऊन तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे. कोविडमुळे पालकत्व हरवलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदविका महाविद्यालयात शिष्यवृत्ती देणार आहोत. कोणत्याही मुलाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकडे लक्ष देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावयाचा आहे त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा. त्याचबरोबर ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या दवाखान्याचाही रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, ए. एम. नानीवडेकर, प्राचार्य पी. आर. पाटील, डॉ. रेखा शेरबेट, प्राचार्य डी. बी .पाटील उपस्थित होते.

फोटो - १८०८२०२१-जेएवाय-०१-गणपतराव पाटील

Web Title: Scholarships for students who have lost parenthood in Kovid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.