मंदिराच्या दानपेटीतील रकमेतून शालेय मुलांना दप्तर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:45 PM2019-04-28T23:45:05+5:302019-04-28T23:45:09+5:30

सांगली : देव हा भावाचा भुकेला असतो, असे म्हणतात. तरीही भाविक आपल्या इच्छेने मंदिरांच्या दानपेटीमध्ये यथाशक्ती दान करतातच. अशा ...

School allotment to school children from donors' money | मंदिराच्या दानपेटीतील रकमेतून शालेय मुलांना दप्तर वाटप

मंदिराच्या दानपेटीतील रकमेतून शालेय मुलांना दप्तर वाटप

Next

सांगली : देव हा भावाचा भुकेला असतो, असे म्हणतात. तरीही भाविक आपल्या इच्छेने मंदिरांच्या दानपेटीमध्ये यथाशक्ती दान करतातच. अशा दानातून मंदिरांचे व्यवस्थापक मंडळ वार्षिक खर्च भागवितात त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रमही राबवितात. अशाच सामाजिक जाणिवेतून गव्हर्मेंट कॉलनीतील श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अंगणवाडीतील मुलांना पोषण आहाराचे तसेच शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचे वितरण करण्यात आले.
गव्हर्मेंट कॉलनी येथील दत्त मंदिर परिसरात प्रसिध्द आहे. श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत येथील व्यवस्थापन पाहिले जाते. मंदिरात दानस्वरूपात जमा होणाऱ्या पैशातून प्रत्येकवर्षी शालेय मुलांसाठी रक्कम बाजूला काढून गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. यंदाही पंधरवड्यापूर्वी मंदिरातील दानपेटी उघडण्यात आली. यात जमलेल्या पैशातून आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून श्री रेवाप्पा दुर्गा कदम ज्ञानमंदिर शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील ३० विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. तसेच हिरकणी अंगणवाडी क्र. १७२ मधील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, विलासराव सूर्यवंशी, धनपाल नांदणीकर, वसंत शिंदे, मल्लिकार्जुन घेवारी, शालिनी पवार, शंकरराव पाटील, आशालता जाधव, दादासाहेब जाधव यांच्याहस्ते मुलांना पोषण आहार तसेच दप्तराचे वाटप करण्यात आले.
दत्त मंदिर परिसरातील हिरकणी अंगणवाडीतील लहान मुलांना पोषण आहारामध्ये खारीक, बदाम, बेदाणा, काजू, काळे बेदाणे अशी खाद्याची पाकिटे बनवून वाटण्यात आली. रेवाप्पा कदम ज्ञानमंदिर शाळेत ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क भरण्याची ऐपत नाही, असे विद्यार्थी शोधून त्यांना त्याचा लाभ दिला जातो. याशिवाय रक्तदानासारखे सामाजिक उपक्रमही राबविले जातात.

Web Title: School allotment to school children from donors' money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.