शाळा बंद, सोशल मीडियाचा वापरः अभ्यासिका सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 04:18 PM2020-04-18T16:18:16+5:302020-04-18T16:22:07+5:30
दिवसभराचा अभ्यास वाँटस अपवरून द्यायचा आणि संध्याकाळपर्यंत तो सोडवून घेतला जात आहे.तसेच, आँनलाईन वाचनही घेतले जात आहे.याबाबत विद्यार्थ्यांसह पालकात समाधानाचे वातावरण आहे.
दत्ता पाटील
म्हाकवे ---लाँकडाऊनमुळे महिनाभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र,कागल तालुक्यातील सर्वच शाळांनी सोशल मीडियाचा वापर करत अभ्यासिका सुरू ठेवली आहे. सकाळी दिवसभराचा अभ्यास वाँटस अपवरून द्यायचा आणि संध्याकाळपर्यंत तो सोडवून घेतला जात आहे.तसेच, आँनलाईन वाचनही घेतले जात आहे.याबाबत विद्यार्थ्यांसह पालकात समाधानाचे वातावरण आहे.
१६मार्चपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच शाळांना सुट्टी दिली आहे.मात्र,मुलांच्या अभ्यासाच्या सवयीत खंड पडणार आहे.याचा विचार करून शिक्षकांनी संबंधित वर्गातील पालकांचे वाँटस अप नंबर एकत्रित करून ग्रुप बनविले आहेत. या माध्यमातून वर्गशिक्षक सकाळी अभ्यास देतात. तसेच,काही प्रश्नावली,गणिते,भुमितीची उदाहरणे देवून ती सोडवून घेतली जात आहेत. दरम्यान, अगदी चार दोन पालकांकडे आँनड्राईड फोन नाहीत. ते विद्यार्थी शेजारच्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास घेवून सोडवत आहेत.
"कोरोनाचे संकट असल्याने विद्यार्थी घराबाहेर जावू नयेत तसेच, त्यांच्या बुद्धीकौशल्याला चालना मिळावी. ते अभ्यासात राहावेत या उद्देशाने तालुक्यातील शिक्षकांकडून याची नित्यनियमाने अंमलबजावणी होत आहे. ही कौतुकाची बाब आहे.
डॉ. गणपती कमळकर
गटशिक्षणाधिकारी, कागल
"सध्या, पालकांमध्येही जागृकता वाढली आहे. त्यामुळे वाँटस अपवर अभ्यास मिळताच ते मुलांना सांगून अभ्यास घेत आहेत. ही बाबही कौतुकास्पद आहे.
सुनिल पाटील शिक्षक,म्हाकवे