गगनबावडा तालुक्यात शाळांची दुरवस्था
By admin | Published: November 18, 2016 12:48 AM2016-11-18T00:48:40+5:302016-11-18T00:48:40+5:30
मणदूर, मांडुकली या शाळांच्या इमारतीत जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते.
चंद्रकांत पाटील -- गगनबावडा गगनबावडा तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपैकी तिसंगी, मणदूर, मांडुकली या शाळांच्या इमारतीत जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. शिक्षण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष आहे. मणदूर प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीचे छप्पर कमकुवत झाले आहे. अनेकवेळा दुरुस्तीची मागणी करूनही, शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केली आहे. अनेक वर्षांपासून दुरुस्ती रखडल्याने छप्पराचे लाकूड सडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती आहे. अशीच अवस्था मांडुकली गावठाण शाळेचीही आहे. येथील दोन वर्ग खोल्यांचे छप्पर कोसळण्याच्या अवस्थेत आहे.
तालुक्यातील मध्यवर्ती व प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या तिसंगी गावच्या ज्ञानसाधना विद्यामंदिराचीही इमारत धोकादायकअवस्थेत आहे. या शाळेच्या मुख्य इमारतीची पावसाळ्यात निकृष्ट बांधकामामुळे संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे इमारतीचा धोका अधिकच वाढला आहे. तालुक्यातील या तीन शाळांच्या धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेतचा
प्रश्न गंभीर बनला आहे. या तिन्ही शाळांच्या इमारती धोकादायक बनलेल्या असल्याने पंचायत समिती शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष
आहे.
पंचायत समितीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. गगनबावडा तालुक्यात ज्ञान रचनावाद चांगला रुजत चालला असताना मणदूर, तिसंगी, मांडुकली, शाळांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अश धोकादायक इमारतींची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी पालकांतून होत आहे.