Kolhapur: बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 04:39 PM2023-11-20T16:39:21+5:302023-11-20T16:42:04+5:30
दाट गवताच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारिकावर हल्ला केला
एम. एम. गुरव
शित्तुर वारुण: बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी ठार झाली. सारिका बबन गावडे असे या मृत मुलीचे नाव आहे. शाहुवाडी तालुक्यातील शित्तुर वारुण पैकी तळीचावाडा येथे ही दुर्दैवी घटना घडली.
सारिका आपल्या चुलतीसोबत घराशेजारीच शेळी चारण्यासाठी गेली होती. दरम्यानच घरापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या मंदिराजवळ दाट गवताच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सारिकावर हल्ला केला. यावेळी चुलतीने आरडाओरडा केल्यावर बिबट्या पळून गेला. मात्र, सारिकाचा जागेवर मृत्यू झाला. असून सदर घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाणे व वनविभाग मलकापूर येथे झाली आहे.
गेल्या काही दिवसापासून बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत केदारलिंगवाडी येथील शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू, उखळू येथील शाळकरी मुलावर हल्ला, कदमवाडी येथे एकावर प्राणघातक हल्ला, 20 पेक्षा जास्त गायी म्हैसी, 50 शेळ्या, कुत्री बिबट्याने ठार केली आहेत. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.