शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न

By Admin | Published: February 28, 2015 12:47 AM2015-02-28T00:47:54+5:302015-02-28T00:48:21+5:30

चारचाकी वाहनामधून आले होते अपहरणकर्ते

School kidnapping attempt | शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न

शाळकरी मुलाचा अपहरणाचा प्रयत्न

googlenewsNext

कोल्हापूर : जवाहरनगर येथील रेहान सादिक पटवेगार (वय १०) या शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न शुक्रवारी रात्री महापालिका परिसरात फसला. प्रसंगावधान राखून हाताला हिसडा मारून रेहान पळून जाण्यात यशस्वी ठरला. चारचाकी वाहनातून चार संशयित अपहरणकर्ते तोंडाला रूमाल बांधून आले होते. घटनेनंतर पटवेगार कुटुंबीयांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस याबाबत माहिती घेत होते. दरम्यान, गत आठवड्यात टाऊन हॉल बागेजवळून दोन वर्षांच्या फरहान उर्फ आय्यान जांभारकर या बालकाचे अपहरण झाले आहे. तो अद्याप सापडलेला नाही.
याबाबत पटवेगार कुटुंबीयांनी सांगितले की, जवाहरनगर येथील रेहान सादिक पटवेगार हा रोज लक्ष्मीपुरी स्वयंभू गणेश मंदिर परिसरात शिकवणीला येतो. शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे सायंकाळी शिकवणीला आला. शिकवणीनंतर तो वडिलांच्या शिवाजी मार्केटमधील दुकानाकडे निघाला. त्यावेळी महापालिका येथील भाऊसिंगजी रोडवर सोमवार पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चारचाकी व्हॅन थांबली होती. गाडीमध्ये चौघेजण रूमाल बांधून बसले होते. त्यातील दोघेजण रूमाल बांधून बाहेर आले. अपहरणकर्त्यांनी रेहानला रस्त्यावर अडवून शीतपेय दिले. मात्र त्याने शीतपेय घेतले नाही. तो शीतपेय घेत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याला जबरदस्तीने दोघे अपहरणकर्ते गाडीत घालू लागले. त्यांना चकवा देऊन महापालिकेमार्गे तो पसार झाला. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र, रेहान पटवेगार मिळून आला नाही.
याचसुमारास तो एका गाडीच्या बाजूला रडत बसला. थोड्या वेळाने तो वडिलांकडे गेला व घडल्या प्रकाराची माहिती दिली. सादिक हे त्याला घरी घेऊन आले. त्यांनी हा प्रकार कुटुंबीयांना व मित्रमंडळींना सांगितला. त्यानंतर रेहान, त्याचे वडिल सादिक व आजोबा व मित्रपरिवारासह लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात रात्री आले. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांचाल यांना सांगितला. रेहानकडून याची पोलिसांनी माहिती घेतली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गस्त घालण्याच्या सूचना पांचाल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या.
चार दिवसांपासून पाळत...
रेहान पटवेगार हा ताराबाई पार्क येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतो. चार दिवसांपूर्वी अपहरणकर्त्यांपैकी एकजण पाळत ठेवून शाळेच्या आवारात थांबून होता, असे पोलिसांना त्याने सांगितले.
आजोबा झाले भावनावश...
रेहान पटवेगार यांचे आजोबांनी पोलीस उपनिरीक्षक पांचाल यांना कोल्हापुरात असे दिवसेंदिवस प्रकार वाढत आहे. याची गंभीर दखल घ्या. आमचा नातू आम्हाला सुखरूप पोहोचला,असे भावनावश होत त्यांनी सांगितले.
 

Web Title: School kidnapping attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.