मनपा हद्दीतील शाळा, महाविद्यालये व खासगी कोचिंग क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:56+5:302021-04-07T04:23:56+5:30

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, कोल्हापूर शहरात हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशान्वये शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, ...

Schools, colleges and private coaching classes closed till April 30 | मनपा हद्दीतील शाळा, महाविद्यालये व खासगी कोचिंग क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंद

मनपा हद्दीतील शाळा, महाविद्यालये व खासगी कोचिंग क्लासेस ३० एप्रिलपर्यंत बंद

Next

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, कोल्हापूर शहरात हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशान्वये शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये (सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यम) व खासगी कोचिंग क्लासेस दि. ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी उपआयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिले.

बंद कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे आहे. त्याचबरोबर इयत्ता दहावी, बारावीचे वर्ग कोविड-१९ नियमांचे पालन करून बोर्ड परीक्षा होईपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्याचे नाही, जेणेकरून आकस्मिक प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तत्काळ कोरोना कामकाजावर हजर राहता येईल. यासाठी संबंधितांना आदेश दिलेले आहेत.

शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ आरटीपीसीआर चाचणी व लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. जर यामध्ये कोणतीही कसूर झाल्यास संबंधितांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपआयुक्त आडसूळ यांनी केले आहे.

Web Title: Schools, colleges and private coaching classes closed till April 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.