शासनाचा लेखी आदेश येईपर्यत जिल्ह्यातील शाळा बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 03:47 PM2020-07-01T15:47:54+5:302020-07-01T15:50:43+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने दि. ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने वर्ग सुरु करण्याबाबत शासनाकडून सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत. त्याबाबतचा निर्णय जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने बुधवारी घेतला.

Schools in the district will remain closed till the written order of the government comes | शासनाचा लेखी आदेश येईपर्यत जिल्ह्यातील शाळा बंद राहणार

कोल्हापुरात बुधवारी विद्याभवनमधील बैठकीत जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून दत्ता पाटील, दादा लाड, भरत रसाळे, एस. डी. लाड, जयंत आसगावकर, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देशैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत निर्णय शासनाच्या दोन्ही आदेशांवर चर्चा

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने दि. ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने वर्ग सुरु करण्याबाबत शासनाकडून सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत. त्याबाबतचा निर्णय जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने बुधवारी घेतला.

येथील विद्याभवनमध्ये शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघाची बैठक झाली. अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते. बैठकीच्या प्रारंभी शासनाच्या दि. १५ आणि २४ जूनच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या शासन निर्णयात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याबाबतचा उल्लेख केला आहे.

शाळा सुरू करण्याबाबत शाळा समित्यांच्या बैठकीत मंजूरी घेऊन स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी असे सूचित केले. त्यानंतर २४ जूनच्या शासन निर्णयात शिक्षकांच्या उपस्थिती आणि अंमलबजावणीची माहिती होती. या आदेशामुळे शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली.

सध्या शाळा सुरू करण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश नसताना मुख्याध्यापकांनी स्वतःच्या जबाबदारीवर शाळा सुरु करणे अडचणीचे आहे. याबाबत जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत एकवाक्यता येण्यासाठी शासनाचे सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय एस.डी.लाड यांनी जाहीर केला.

या बैठकीस मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, शिक्षक नेते दादा लाड, संस्थाचालक संघाचे सचिव प्रा. जयंत आसगावकर, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, शिवाजी माळकर, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, शिवाजी कोरवी, आदी उपस्थित होते. मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मानले.

 

Web Title: Schools in the district will remain closed till the written order of the government comes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.