शालेय विद्यार्थी ताडी-माडीच्या आहारी, व्यसनाची पहिली पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:57 AM2018-04-10T00:57:56+5:302018-04-10T00:57:56+5:30

The school's first step of addiction, addiction | शालेय विद्यार्थी ताडी-माडीच्या आहारी, व्यसनाची पहिली पायरी

शालेय विद्यार्थी ताडी-माडीच्या आहारी, व्यसनाची पहिली पायरी

Next
ठळक मुद्देकांडवण, शित्तूर-वारुण परिसरात तीन जिल्ह्यांतील लोकांची वर्दळ

शित्तूर-वारूण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील वारणा आणि काणसा खोऱ्याची ओळख आता ताडी-माडी विक्रीचे केंद्र म्हणून नव्याने नवारूपास येत आहे. त्यापैकी कांडवण व शित्तूर-वारूण हे मुख्य केंद्र मानले जाते. दारू पिणे खिशाला परवडणारे नसल्याने तळीरामांनी आपला मोर्चा ताडी-माडीकडे वळवला आहे. लाईफ इज एंजॉय म्हणत शालेय विद्यार्थ्यांची ताडी-माडी पिणाºयांच्यामध्ये भर पडली आहे. या ताडी-माडीत जास्तीत जास्त नशा निर्माण व्हावी यासाठी नवसागर, चुना अशा घातक रसायनांचा वापर केला जात असल्याची चर्चा या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
दारू पिण्याचे बेसिक ट्रेनिंग म्हणजे ताडी-माडी. पिण्याची सुरुवात ही ताडी-माडीपासून होते. माडी हे औषध म्हणूनही अनेक स्त्रिया, लहान मुले यांना पाजले जाते. मात्र, ती भेसळ केली जात असल्यामुळे फक्त नशेकरिता प्राशन केली जात
आहे. परिणामी दहावी-बारावीत शिकणाºया विद्यार्थ्यांच्या ताडी-माडी पिणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. व्यसनाची सुरुवात ही अशा पद्धतीने होते आणि त्यातच दारूचे दर हे पन्नास-शंभर रुपयांपेक्षा अधिक असल्याने अनेकांना ते परवडत नाहीत. तुलनेने माडीचा अर्धा लिटरचा एक तांब्या तीस ते चाळीस रुपयांना मिळतो आणि नशा मात्र जवळजवळ दारूइतकीच होते. त्यामुळे सध्या या परिसरात दारूपेक्षा माडीचा धंदाच अधिक तेजीत चालतो. दगडापेक्षा वीट मऊ असली तरी ती आघातानंतर जखमी करते, प्रसंगी जीवघेणीही ठरू शकते. तशीच अवस्था नशा आणणारे रसायन मिसळल्यामुळे या
परिसरात मिळणाºया ताडी-माडीची आहे.
ताडी-माडी ज्या झाडातून काढली जाते, त्याच ठिकाणी विक्रेत्यांमध्ये ती विकली जाते. झाडावरून ताडी-माडी काढण्यापासून ते घशाखाली जाईपर्यंतच्या दोन-तीन टप्प्यांवर ताडी-माडीत भेसळ केली जात असल्याचे बोलले जात आहे. ताडी-माडीत भेसळ होत नसेल तर त्याची नशा जवळपास दारूसारखी कशी, असा सवाल परिसरातून या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सध्याची भेसळयुक्त ताडी-माडी पिणारा तरुण हा उद्याचा तळीराम असण्याचीच शक्यता अधिक असते. अशी अनेक उदाहरणे या भागात गेल्या काही वर्षात घडलेली आहेत. अन्नबाधा, विषबाधा यातून जशी माणसे दगावतात, त्याप्रमाणे ताडी-माडीत होणाºया भेसळीमुळे माडीबाधा होऊन माणसे दगावण्याअगोदर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

दुचाकींची मोठ्या प्रमाणात ये-जा
कांडवण, शित्तूर-वारुण या परिसरात ताडी-माडी पिण्यासाठी दुचाकी-चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कºहाड, सातारा, शिराळा, इस्लामपूर, सांगली व कोल्हापूर परिसरातील अनेक लोक ताडी-माडी पिण्यासाठी या परिसरात रोज येतात.

या परिसरात ताडी-माडीची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यामध्ये होणारी भेसळ ही माणसाच्या शरीराला हानीकारक आहे. पोलीस यंत्रणेची या व्यवसायाकडे होत असलेली डोळेझाक ही गंभीर बाब आहे. माडी ज्या ठिकाणी झाडावरून काढली जाते, त्या ठिकाणापासून ते विक्रेत्यांपर्यंत कोणावरही कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्यामुळे त्यामध्ये नशिल्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
- हरीश कांबळे (जिल्हा कौन्सिल आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन)

Web Title: The school's first step of addiction, addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.