शाळांना मुदतवाढ देऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:29 AM2021-02-25T04:29:00+5:302021-02-25T04:29:00+5:30
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या तीन शाळा खासगीकरणासाठी दिल्या आहेत. त्यांची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळावी, या संदर्भातील विषय ...
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या तीन शाळा खासगीकरणासाठी दिल्या आहेत. त्यांची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळावी, या संदर्भातील विषय नगरपालिकेने कौन्सिल सभेमध्ये विषय क्रमांक २४ मध्ये घेतला आहे. त्याला भारताची लोकशाही युवा फेडरेशनने विरोध केला असून, शाळांना आणखी मुदतवाढ देऊ नये, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्षा अलका स्वामी यांना शिष्टमंडळाने दिले आहे.
या निवेदनात, नगरपालिकेकडे ६२ शाळा असून, त्यापैकी ९ शाळांचे खासगीकरण करण्यात आले आहे. देशामध्ये सगळीकडे सरकारी शाळांचे खासगीकरण सुरू असून, दिल्ली येथे केजरीवाल सरकारने सर्व सरकारी शाळा डिजिटल स्वरुपात केल्या आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी शिवजयंती दिनी सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करू, अशी घोषणा केली होती. त्यामुळे सध्या खासगीकरणासाठी दिलेल्या शाळांना येथून पुढे मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी केली आहे. या शिष्टमंडळात सदा मलाबादे, भरमा कांबळे, सुभाष कांबळे, अमित कोरवी, नूरमहंमद बेळकुडे, आदींचा समावेश होता.