वकिलांचे लेखनिक ते इस्पूर्लीचे सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:47 AM2021-03-13T04:47:06+5:302021-03-13T04:47:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत इस्पूर्लीच्या सरपंचपदी विराजमान झालेले राजाराम सदाशिव पाटील (म्हाकवेकर) याचे समाजकार्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत इस्पूर्लीच्या सरपंचपदी विराजमान झालेले राजाराम सदाशिव पाटील (म्हाकवेकर) याचे समाजकार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर सिटी क्रिमीनल कोर्ट प्रॅक्टीशनर्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विक्रम सावंत यांनी केले. कसबा बावडा येथे असोसिएशनच्यावतीने पाटील यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
ॲड. सावंत म्हणाले, पाटील यांनी गावचा कारभार लोकाभिमुख करून आपल्या कार्याचा ठसा उमटवावा. ॲड. गिरीश नाईक म्हणाले, राजाराम पाटील यांनी माझ्याकडे गेली तीस वर्षे लेखनिक म्हणून उत्तम प्रकारे सेवा केली. त्यांचे प्रेरणादायी कार्य सतत डोळ्यासमोर राहील. ॲड. सतीश खोतलांडे म्हणाले, गोरगरिबांची सेवा करणाऱ्या राजाराम यांनी प्रतिकुल परिस्थितीत केलेल्या कार्याला आमचा सलाम असेल. यावेळी असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील, ॲड. कोमल राणे, ॲड. एम. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव ॲड. प्रवीणकुमार यादव यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष ॲड. तेजस साठम यांनी आभार मानले.
फोटो : १३०३२०२१-कोल-इस्पुर्ली
आेळी : इस्पुर्लीच्या सरपंचपदी निवड झालेले राजाराम पाटील यांचा कसबा बावड्यातील कोल्हापूर सिटी क्रिमीनल कोर्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विक्रम सावंत यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. प्रवीणकुमार यादव, माजी अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील, ॲड. सतीश खोतलांडे, ॲड. गिरीश नाईक उपस्थित होते.