स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये पुंगळ्यांची तपासणी होणार

By admin | Published: May 5, 2016 01:04 AM2016-05-05T01:04:30+5:302016-05-05T01:04:56+5:30

न्यायालयाची परवानगी : २० मे रोजी समीर विरोधात दोषारोपपत्र

Scrutiny will be examined in the Scottish forensic lab | स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये पुंगळ्यांची तपासणी होणार

स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये पुंगळ्यांची तपासणी होणार

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिन्ही हत्यांच्या तपासातील पुंगळ्यांची (काडतुसे) इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. ‘सीबीआय’ने पुण्यापाठोपाठ कोल्हापुरातील सत्र न्यायालयात अर्ज करून त्यासंबंधी परवानगी मागितली होती. त्यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी बुधवारी मंजुरी दिली. या तिन्ही हत्यांचा तपास परदेश स्तरावर पोहोचल्याने गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे.
दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात शुक्रवारी (दि. २० मे) रोजी दोषारोपपत्र निश्चित करण्यात येणार आहे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्याच्या निर्णयावर बुधवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांच्या दालनात सुनावणी झाली. ‘सीबीआय’चे अप्पर पोलिस अधीक्षक एस. आर. सिंग यांनी बंगलोर व मुंबई फॉरेन्सिक लॅबमधून पानसरे, डॉ. दाभोलकर व डॉ. कलबुर्गी या तिन्ही हत्यांचा तपासातील पुंगळ्यांचे अहवाल वेगवेगळे आले आहेत. त्यामुळे आम्ही इंग्लंडमधील न्यू स्कॉटलँड फॉरेन्सिक लॅबमधून पुन्हा तपासणी करून अहवाल मागवून घेणार आहे. त्यासाठी पुणे न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पानसरे हत्येप्रकरणातील पाच पुंगळ्या तपासण्यासाठी मंजुरी द्यावी, असा अर्ज सत्र न्यायालयाकडे केला होता. त्यास न्यायाधीश बिले यांनी मंजुरी दिली. पानसरे हत्येप्रकरणातील पाच, डॉ. दाभोळकर व कलबुर्गी प्रत्येकी दोन अशा नऊ पुंगळ्यांची (काडतुसे) पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाचे आदेशाची प्रत पाहून समीर गायकवाड विरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्यासाठी (दि.२० मे) रोजी ठेवण्यात आल्याचे न्यायाधीश बिले यांनी सांगितले. याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक चैतन्या एस., ‘सीबीआय’चे पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके, मेघा पानसरे, आदी उपस्थित होते.

Web Title: Scrutiny will be examined in the Scottish forensic lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.