कारखान्यांची धुराडी थंडावली
By Admin | Published: March 3, 2017 11:42 PM2017-03-03T23:42:14+5:302017-03-03T23:42:14+5:30
उताऱ्यात अर्धा टक्क्याने घट : साखर उताऱ्यात सहकारीपेक्षा खासगी कारखान्यांची आघाडी
प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर विभागात उसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने यावर्षी २०१६-१७चा हंगाम फेब्रुवारी महिन्यातच गुंडाळला आहे. मागील वर्षी (२०१५-१६)च्या हंगामपेक्षा तब्बल ७५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप कमी झाले आहे. सरासरी साखर उताऱ्यातही ०.४२ टक्क्यांनी घट झाल्याने साखर उत्पादनही एक कोटी एक लाख ५१ हजार ३१५ क्विंटलने कमी झाले. साखर उताऱ्यात सहकारी पेक्षा खासगी साखर कारखान्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी २०१६ मध्ये एप्रिल, मे मध्ये दुष्काळसदृश परिस्थितीने शेतीसाठीच्या पाणी उपशावर
बंदी घालण्यात आली. यामुळे उसाची उभी पिके करपली होती. त्यातच संभाव्य पाणीटंचाई ओळखून शेतकऱ्यांनीही ऊस लागवडीला फाटा दिला होता. याचा परिणाम १० ते १५ हेक्टरवरील उसाचे क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातील कमी झाले होते, तर जून-जुलैमध्ये झालेल्या प्रचंड पावसाने ऊसपीक वाढीला खो बसला होता. याचा एकत्रित परिणाम साखर कारखान्याच्या गाळप हंगामावर झाला आहे.
कोल्हापूर विभागातील एक-दोन कारखाने वगळता सर्वच कारखान्यांचे गाळप हंगाम फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात गुंडाळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ, शाहू कागल, तर सांगली जिल्ह्यातील रा. बा. पाटील साखराळे युनिट-१ हे तीन कारखाने सुरू असले तरी येत्या चार दिवसांत हे कारखानेही बंद होणार आहेत.
यावर्षी कोल्हापूर विभागातील ४१ साखर कारखान्यांपैकी ३६ साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला. पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन, सांगली जिल्ह्यातील एक पूर्णत: बंद राहिले व दोन कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले तरी उसाअभावी बंद पडले. या हंगामात कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास २३ कारखान्यांपैकी २१ कारखान्यांनी आपले गाळप हंगाम पूर्ण केले असून, १ कोटी २ लाख ३ हजार ४४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११.९९ च्या सरासरी उताऱ्यासह एक कोटी २० लाख २१ हजार ८६७ मेट्रिक टन उसाचे साखर उत्पादन केले आहे. जवाहर, हुपरी कारखान्याने कोल्हापूर विभागात सर्वांत जास्त १३ लाख ८६ हजार ५१० मे. टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे, तर वारणा १३ लाख २८ हजार ७२० मे. टन उसाचे गाळप करून द्वितीय व दत्त शिरोळ ८ लाख ३५ हजार २४५ मे. टन उसाचे गाळप करून तिसऱ्या स्थानावर आहे. साखर उताऱ्यात गुरुदत्त टाकळीने १३.०० टक्के सरासरी उतारा
मिळवून प्रथम, तर कुंभी-कासारी, कुडित्रेने १२.८० उतारा मिळवीत दुसरा व बिद्री १२.६७ टक्के उतारा मिळवीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्यात
विक्रमी घट झाली असून कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ४६ लाख ३९ हजार ७२६ मेट्रिक टन उसाचे कमी गाळप झाले आहे.
सांगली जिल्ह्यातही अशी परिस्थिती असून, अठरा साखर कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांनीच आपले गाळप हंगाम पूर्ण केले आहेत. एक बंद, तर दोन साखर कारखान्यांनी उसाअभावी गाळप हंगाम सुरू करून बंद केले आहेत. सांगली जिल्ह्यात ४९ लाख ५३ हजार ८८९ मे. टन उसाचे गाळप झाले असून, मागील वर्षीपेक्षा ३० लाख ३२ हजार ५८९ मेट्रिक टन ऊस गाळप कमी झाले आहे. सर्वाेदय रा. बा. पाटील युनिट-३ कारखान्याने साखर उतारा १२.७५टक्के मिळवीत चांगली कामगिरी केली आहे.
ऊस गाळपात ‘जवाहर’, हुपरी, तर सरासरी साखर उताऱ्यात ‘गुरुदत्त’ टाकळीची आघाडी
कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ४६ लाख ३९ हजार ७२६ मेट्रिक टन उसाचे कमी गाळप
कोल्हापूर जिल्हा एकूण साखर कारखाने २३
हंगामहंगाम सुरूबंदएकूण उसाचे गाळप साखर उत्पादनसरासरी साखर
केलेले कारखानेकारखाने(मेट्रिक टन)(क्विंटलमध्ये)उतारा
२०१६-१७२१०२१ कोटी २३ हजार ४४१ कोटी २० लाख २१ हजार ८६७११.९९
२०१५-१६२१०२१ कोटी ४६ लाख ३१ हजार ५९३१ कोटी ८४ लाख ७३ हजार ५१२.६०
सांगली जिल्हा एकूण साखर कारखाने १८
हंगामहंगाम सुरूबंदएकूण उसाचे गाळप साखर उत्पादनसरासरी साखर
केलेले कारखानेकारखाने(मेट्रिक टन)(क्विंटलमध्ये)उतारा
२०१६-१७१५०३४९ लाख ५३ हजार ८८९५९ लाख ३३ हजार ४६३११.९८
२०१५-१६१७०१७९ लाख ८६ हजार ४७८९६ लाख ३३ हजार ६४०१२.०६