थकीत घरफाळा असणाऱ्यांच्या मिळकती होणार सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:12 PM2019-12-02T15:12:06+5:302019-12-02T15:14:54+5:30

थकीत घरफाळा असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली असून, मुदतीमध्ये थकीत रक्कम जमा केली नसल्यास संबंधितांची मिळकतच सील केली जाणार आहे.

Seals will be the property of those with outstanding homes | थकीत घरफाळा असणाऱ्यांच्या मिळकती होणार सील

थकीत घरफाळा असणाऱ्यांच्या मिळकती होणार सील

Next
ठळक मुद्देथकीत घरफाळा असणाऱ्यांच्या मिळकती होणार सीलघरफाळा विभागाची ६८५ मिळकतधारकांना नोटीस

कोल्हापूर : थकीत घरफाळा असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली असून, मुदतीमध्ये थकीत रक्कम जमा केली नसल्यास संबंधितांची मिळकतच सील केली जाणार आहे.

महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी वसुलीसाठी विशेष लक्ष दिले आहे. यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. घरफाळा विभागाच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयाने थकीत ६८५ मिळकतदारांना नोटीस बजावली आहे. थकीत रक्कम जमा केली नाही तर मिळकत सील करणे, मालमत्तेवर बोजा नोंद करणे, २४ टक्केदंड व्याज आकरणी करणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे.

कराची रक्कम जमा करण्यासाठी तसेच नवीन मिळकतींवर घरफाळा नोंद करण्यासाठी कसबा बावडा, प्रभाग क्रमांक १ शुगर मिल व प्रभाग क्रमांक ३ हनुमान तलाव येथे पुढील आठवड्यामध्ये विशेष शिबिर आयोजित केले आहे. दरम्यान, कावळा नाका विभागीय कार्यालयाने ८ लाख ४९ हजार, तर गांधी मैदान विभागीय कार्यालय २ लाख ७३ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
 

 

Web Title: Seals will be the property of those with outstanding homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.