अनियमित, शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:01+5:302021-03-04T04:43:01+5:30
कोरोनामुळे मार्च २०२० शाळा बंद करण्यात आल्यामुळे सर्वांनाच घरी राहावे लागले तर अनेक ठिकाणी बालमजुरीचे प्रमाण व बालविवाहांच्या प्रमाणात ...
कोरोनामुळे मार्च २०२० शाळा बंद करण्यात आल्यामुळे सर्वांनाच घरी राहावे लागले तर अनेक ठिकाणी बालमजुरीचे प्रमाण व बालविवाहांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे १ ते १८ वयोगटांतील मुलांचा सर्व्हे करून त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे हा या सर्वेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ग्रामीण स्तरावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका व आरोग्यसेविकांना प्रगणक म्हणून नेमणूक केली आहे. १ ते १० मार्च या दहा दिवसांतील सुटीखेरीज कामकाजादिवशी प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे होणार आहे.
तीन ते सहा वयोगटांतील हा बालकांचा अंगणवाडीचा गट सहा ते चौदा वयोगट हा प्राथमिक तर पंधरा ते अठरा वयोगटांतील माध्यमिक शिक्षणासाठी त्यामुळे तीन ते अठरा वयोगटांतील मुलांचा सर्व्हे करून त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.