‘समीर’ला पैसे देतो म्हणणाऱ्याचा शोध घ्या--त्यांची नार्को टेस्ट करा : या राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवूच : वर्तक

By admin | Published: December 1, 2015 12:42 AM2015-12-01T00:42:00+5:302015-12-01T00:42:16+5:30

अभय वर्तक यांचे आवाहन : ‘सनातन संस्थे’ची जनसंवाद सभा, ...तर खरे खुनी सापडतील

Search for 'Samir' who says money - test his Narco: make this nation a Hindu Nation: Vartak | ‘समीर’ला पैसे देतो म्हणणाऱ्याचा शोध घ्या--त्यांची नार्को टेस्ट करा : या राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवूच : वर्तक

‘समीर’ला पैसे देतो म्हणणाऱ्याचा शोध घ्या--त्यांची नार्को टेस्ट करा : या राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवूच : वर्तक

Next

कोल्हापूर : समीर गायकवाड याला २५ लाख रुपये देतो म्हणणारे हे पोलीस खात्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचेच हस्तक आहेत, त्यांचा शोध घ्या, म्हणजे खुनी सापडतील, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवर्तक अभय वर्तक यांनी केले.
सनातन संस्थेच्यावतीने जनसंवाद सभेचे आयोजन सोमवारी राजारामपुरी येथील इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवनमध्ये केले होते. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी हिंदू जनजागरचे सुनील घनवट हे उपस्थित होते.
हिंदुत्वाचा जागर करणाऱ्या सनातन संस्थेला आतंकवादी ठरविण्यासाठी या पुरोगामी संस्था एकवटल्या आहेत. या संस्था लोकांमध्ये आतंकवाद ठसविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे सांगून अभव वर्तक म्हणाले, आज समीर गायकवाडला पकडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सनातन संस्थेवर बंदीची मागणी पुढे केली जाते. देशामध्ये हिंदू आतंकवाद पसरविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यंत्रणा सरसावली आहे. त्यांचे नेते जेलमध्ये असताना कधीही त्यांच्या पक्षावर बंदीची मागणी केली नाही. समीर गायकवाडला २५ लाख रुपये देतो, असे सांगणारे हे काँग्रेस, राष्ट्रवादीचे हस्तकच पोलीस खात्यात आहेत. त्यांना शोधल्यास अ‍ॅड. पानसरे यांचा खुनी सापडेल, अशाच पद्धतीचे आमिष डॉ. दाभोलकर खून प्रकरणी नागोरी आणि खंडेलवाल यांना राकेश मारिया यांनी दाखविल्याचा आरोपही केला. यामुळे पोलिसांना खरे खुनी माहीत आहेत. संघर्ष यात्रा, निवेदने, याचिका हा सर्व देखावा आहे. हे मला गोळ्या घालण्याच्या पाटणकरांच्या फेसबूकवरून दिलेल्या धमकीवरून स्पष्ट होते, असेही ते म्हणाले. साध्वी प्रज्ञासिंह, मेजर उपाध्याय यांच्यासह समीर गायकवाड हे गुन्हेगार असतील, तर त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र का अद्याप दाखल केलेल नाही? असाही प्रश्न त्यांनी केला. हिंदू आतंकवाद सिद्ध करण्यासाठी सनातन संस्थेवर आरोप केले जात आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी हिंदू जनजागरणचे सुनील घनवट म्हणाले, देशात असहिष्णुतेच्या नावाखाली राजकारण सुरू झाले आहे. ज्यांनी हिंदू राष्ट्रांंची मागणी केली, त्यांचा छळ होत आला आहे. देशात संतांचे हनन, हिंदुत्वाची बदनामी करून हिंदुत्व संपविण्याचे काम सुरू आहे; पण हा पुरोगामित्वाचा बुरखा फाडून हिंदू राष्ट्र स्थापनेसाठीं आगेकूच करीत आहोत. प्रचंड उत्पन्न असणाऱ्या मंदिरांचे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सरकारीकरण करून नेत्यांनी जमिनी लाटल्या, त्यांचाही पर्दाफाश झाला पाहिजे. देशातील गुप्तहेर संघटनेवर संशयाचे आरोप करणारे शमशुद्धीन मुश्रीफ यांच्याही चौकशीची मागणी त्यांनी केली. यावेळी बाळासाहेब पोकळे यांनी सूत्रसंचालन केले. सुरुवातीस सनातन संस्थेची व्याप्ती आणि काम याबाबत चित्रफित दाखविण्यात आली. (प्रतिनिधी)


त्यांची नार्को टेस्ट करा : या राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवूच : वर्तक
अ‍ॅड. पानसरे, डॉ. दाभोळकर व एम. एम. कलबुर्गी यांचे खरे आरोपी पकडायचे असतील, तर आम्ही दाखविलेल्यांची नार्को टेस्ट करा म्हणजे सत्य उघडकीस येईल, असाही टोला अभय वर्तक यांनी लगावला.
आम्ही या राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनविल्याविाय राहणार नाही, असाही निर्धार वर्तक यांनी या सभेत व्यक्त केला.
‘सनातन’च्यावतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन
श्रमिक मुक्ती दल अथवा तत्सम संघटना कायदा हातात घेऊन गैरकृ त्य करण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सनातन संस्थेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांच्याकडे केली.
कोम्बिंग आॅपरेशन करून सनातन्यांना ठेचायची भाषा पश्चिम महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी करीत आहेत. त्यांच्या संघटनांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत आणि न्यायालयाचा निवाडा लागेपर्यंत काहीच सांगता येत नाही, असे असतानाही समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याचे काम भारत पाटणकर करीत आहेत.
यातून उद्या गुन्हेगारी कृ त्यातून सनातनच्या साधकांना काही बरेवाईट झाले, तर त्याला जबाबदार कोण असणार? त्यामुळे अशा समाजकंठकांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सनातन संस्थेच्या शिष्टमंडळाने
डॉ. शर्मा यांना दिले. यावेळी अभय वर्तक, मधुकर नाझरे, प्रसाद कुलकर्णी, संतोष सनगर, आदी उपस्थित होते.

.‘सनातन’च्या विरोधात ‘चिंता आंदोलन’
वर्तक यांना अटक करा : पुरोगामी कार्यकर्त्यांची मागणी
कोल्हापूर : हिंसेचे समर्थन करणाऱ्या व ज्यांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे, अशा सनातन संस्थेकडून राजर्षी शाहूंच्या पुरोगामी नगरीत जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते. ही बाब चिंताजनक आहे, असा जाब विचारत पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर चिंता आंदोलन केले.
‘सनातन’ संस्थेचे अध्यक्ष अभय वर्तक यांना जर पानसरे व कलबुर्गी यांचे मारेकरी माहीत असतील, तर त्यांना अटक करून खऱ्या गुन्हेगारांचा शोध घ्यावा, अशी मागणी पुरोगामी कार्यकर्ते अनिल म्हमाणे यांनी केली.
पुरोगामी विचार व अहिंसेच्या मार्गाने कार्य करणारे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या होते. ही बाब निंदनीय असून, या घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत.
या घटनेनंतर संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते व नेते हिंसेचे जाहीर समर्थन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘सनातन प्रभात’ च्या अंकातून तसे जाहीर छापूनही आले आहे. आता याच संघटनेचे प्रमुख अभय वर्तक हे राजर्षी शाहूंच्या नगरीत येऊन जनसंवाद सभा घेत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. याच्या निषेधार्थ पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर ‘चिंता आंदोलन’ केले.
यावेळी अनिल म्हमाणे म्हणाले, ज्या राजर्षी शाहू महाराजांनी समता आणि बंधूतेचा संदेश जगाला दिला. त्यांच्या पुरोगामी नगरीत दहशतवादी कारवाया करणारी सनातन संस्था सभा घेत आहे. पानसरे-कलबुर्गी यांच्या खुनात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप होत असता या संघटनेचे वर्तक यांनी खऱ्या खुन्यांना लपविण्यासाठी पुरोगामी संघटनांकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप केला आहे. आंदोलनात अ‍ॅड. पंडित सडोलीकर, दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, लाला नाईक, गंगाधर म्हमाणे, गणेश पाटोळे, बाजीराव नाईक, डॉ. सुनील पाटील, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


...तर त्यांच्याकडून गुन्हेगारांची माहिती घ्या
वर्तक यांना खुनी माहीत असतील, तर त्यांना अटक करून त्यांच्याकडून खऱ्या गुन्हेगारांची माहिती घ्यावी.

Web Title: Search for 'Samir' who says money - test his Narco: make this nation a Hindu Nation: Vartak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.