लाडक्या “पाख-या” बैलाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:02 AM2021-02-03T11:02:31+5:302021-02-03T11:08:36+5:30
Raju Shetty Kolhapur- सद्याच्या काळात माणूस माणसापासून दूर होऊन नातीगोती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना जनावरांच्या प्रति प्रेम दुर्लभ होत असताना भादोले ( ता. हातकणंगले) येथील शंकर पाटील यांच्या कुटुंबियानी आपल्या लाडक्या पाखऱ्या या बैलाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात साजरा करुन आगळा वेगळा संदेश समाजात देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाची परिसरात होत आहे.
नाना जाधव
भादोले/हातकणंगले- सद्याच्या काळात माणूस माणसापासून दूर होऊन नातीगोती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना जनावरांच्या प्रति प्रेम दुर्लभ होत असताना भादोले ( ता. हातकणंगले) येथील शंकर पाटील यांच्या कुटुंबियानी आपल्या लाडक्या पाखऱ्या या बैलाचा दुसरा वाढदिवस थाटामाटात साजरा करुन आगळा वेगळा संदेश समाजात देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाची परिसरात चर्चा होत आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी या वाढदिवसाला आवर्जून उपस्थिती लावली. पाटील कुटुंबियांनी पाखऱ्याच्या वाढदिवसानिमित्त ४०० लोकांना जेवण घातले. तर वाढदिवसाला आलेले अनेक मित्रमंडळीनी गिफ्ट म्हणून पाखऱ्याला सापती, झूल, येसण, दोरखंड, नाथ, शिवदा वस्तू घेऊन आले होते. आपल्या लेकरांच्या पेक्षाही बळीराजाने या मुक्या जनावरांना लावलेला लळा परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
बैल आभाळाची कृपा , बैल धरतीचा जप !
काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप!
बैल घामाची प्रतिमा , बैल श्रमाचे प्रतिक!
बैल माझ्या शिवारात , काढे हिरवे स्वस्तिक !
भादोले ता. हातकंणगले येथील शंकर पाटील यांचे कुटुंबियानी आपल्या लाडक्या “पाख-या” या बैलाचा दुसरा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. एक शेतकरी नेता या नात्याने या कार्यक्रमास मी आवर्जून उपस्थिती लावली. पाटील कुटूंबियांनी पाख-याच्या वाढदिवसानिम्मीत्त जवळपास ४०० लोकांचे जेवण घातले होते. वाढदिवसाला आलेले अनेक मित्रमंडळी यांनी गिफ्ट पाख-याला म्हणून सापती , झूल, दोरखंड, नाथ , घुंगरू , भवरकडी, घाटीघुंगूर यासारख्या वस्तू घेऊन आले होते.
- राजू शेटटी.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार