सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:06 PM2019-01-09T16:06:55+5:302019-01-09T16:09:53+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरुन केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी भव्य मोर्चाने धडक देत कामगार संघटनांच्या एकजूटीची ताकद दाखवली. कामगारांचा तळतळाट घ्याल तर पुन्हा सत्तेत येउ देणार नाही, असा इशाराही दिला.

For the second consecutive day, a grand rally on the Kolhapur District Collectorate | सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाअंगणवाडी, आशा, मोलकरीण, बांधकामासह कामगार सहभागी

कोल्हापूर: जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरुन केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी भव्य मोर्चाने धडक देत कामगार संघटनांच्या एकजूटीची ताकद दाखवली. कामगारांचा तळतळाट घ्याल तर पुन्हा सत्तेत येउ देणार नाही, असा इशाराही दिला.

केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील कामगार संघटना दोन दिवसीय संपावर आहेत. मंगळवारी संपाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेधाची सुरुवात करण्यात आली, बुधवारी त्यापेक्षा अधिक ताकदीने मोर्चा काढून संपाची सांगता करण्यात आली.

सेंटर आॅफ ट्रेड युनियन जिल्हा कमिटी सिटू, कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर व गटप्रर्वतक युनियन, लाल बावटा, आयटक संघटनेच्या वतीने निघालेल्या या विराट मोर्चात अंगणवाडी, आशा, मोलकरीण, बांधकाम आदि विभागातील सर्व असंघटीत कामगार सहभागी झाले. महिलांची संख्या लक्षणीय होती.

दसरा चौकातून दुपारी एकच्या सुमारास मोर्चास सुरुवात झाली. हातात सिटू व लाल बावट्याचे निशाण आणि घोषणांचे फलक घेउन निघालेला हा मोर्चा व्हीनसकॉर्नर, स्टेशनरोड, असेंब्लीरोड मार्गे दुपारी पावनेदोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर येउन धडकला. मोदी चले जाव, केंद्र व राज्य सरकारचा धिक्कार असो, या सरकारचे करायचे तर काय खाली डोके वर पाय अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

रस्त्यावरच ठिय्या मारत तेथूनच जोरदार घोषणाबाजी सुरु केली. येथेच मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. दिलीप पोवार, अतुल दिघे, सुवर्णा तळेकर, नेत्रदीपा पाटील, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम या सर्वांनी मनोगत व्यक्त करताना कामगारविरोधी सरकारवर टिकेची झोड उठवली.

वाहतूकीची कोंडी

सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर ते असेंब्ली रोड हा पूर्णपणे मोर्चेकऱ्यांनी व्यापल्याने सर्व वाहतूक लक्ष्मीपुरी कोंडा ओेळ व लुगडी ओळमार्गे वळवण्यात आली. त्यामुळे संपूर्ण लक्ष्मीपुरीत वाहतूकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली.जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी सर्व वाहतूकही विस्कळीत झाली. स्टेशनरोडवर रेल्वेस्टेशनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सव्वादोननंतर वाहतूक सुरळीत झाली.

 

Web Title: For the second consecutive day, a grand rally on the Kolhapur District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.