सलग दुसऱ्या वर्षी बजेटची ‘साठी’ पार
By Admin | Published: March 25, 2015 12:09 AM2015-03-25T00:09:08+5:302015-03-25T00:42:15+5:30
अविनाश सुभेदार : गतवर्षीपेक्षा पावणे तीन कोटींची कपात
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचा तब्बल ६२ कोटी १५ लाख ९५ हजारांचा अर्थसंकल्प मंगळवारी सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेचे सभापती अभिजित तायशेटे यांंनी सादर केला. गेल्या वर्षापेक्षा यंदाचा अर्थसंकल्प पावणेतीन कोटींनी कमी असला तरी सलग दोन वर्षे साठ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अर्थसंकल्प मांडण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
रुपया असा आला
पशुसंवर्धन - २३ लाख ५१ हजार
सार्वजनिक बांधकाम - ६६ लाख २८ हजार
संकीर्ण - ५४ लाख ७२ हजार
अनुदाने कर व फी - १ हजार
जमीन महसूल, स्थानिक उपकर, सामान्य उपकर - ८० लाख २ हजार
जमीन महसूल, स्थानिक उपकर, वाढीव उपकर - ८० लाख ३ हजार
मुद्रांक व नोंदणी शुल्क - ८ लाख ५० हजार
मीन महसूल (पंचायत समिती वाढीव उपकर) १ कोटी ५ लाख ६१ हजार ८५०
अनुदाने - स्थानिक कर (पाणीपट्टी उपकर) - १ कोटी २५ लाख
जमीन महसूल - सापेक्ष अनुदान व अभिकरण शुल्क - १ कोटी ४० लाख ८ हजार
व्याज - ८ कोटी १ हजार
शिक्षण - २ लाख २५ हजार
आरोग्य व कुटुंबकल्याण - २२ लाख ५३ हजार
पाणी व स्वच्छता - १ लाख ६४ हजार
कृषीविषयक कार्यक्रम - ४ लाख ३६ हजार
असा खर्चणार रुपया
पंंचायत राज कार्यक्रम - २ कोटी ४८ लाख ४० हजार
शिक्षण - २ कोटी ८० लाख ७२ हजार
जंगले (वन महसूल - शिक्षण) - ९ लाख
सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण - ४ कोटी २९ लाख ३६ हजार
पाटबंधारे - १५ लाख २५ हजार
पाणीपुरवठा व स्वच्छता - ३ कोटी ३० लाख २७ हजार
आयुर्वेदिक (जि. प. दवाखाने) - ८ लाख ३५ हजार
सार्वजनिक आरोग्य - २ कोटी २० लाख १७ हजार
कृषी - १ कोटी ५९ लाख ६१ हजार
पशुसंवर्धन व दुग्धविकास - ८९ लाख २६ हजार
समाजकल्याण - ५ कोटी ८२ लाख ४२ हजार
सामाजिक न्याय व अपंग कल्याण - १ कोटी १८ लाख १६ हजार
समाजविकास - पंचायत समिती सेस - १ कोटी ५ लाख ३७ हजार ४००
महिला व बालकल्याण - ३ कोटी १४ लाख ५० हजार
ग्रामीण विकास, ग्रामपंचायत - १४ कोटी ४९ लाख ७६ हजार
पंचायत राज कार्यक्रम - १ कोटी ५२ हजार.
बजेट की लग्नसमारंभ?
बजेटच्या बैठकीला येणाऱ्या सदस्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले जात होते. याशिवाय सनई, चौघडाही वाजविला गेला. सभागृहात विशेष सजावटही करण्यात आली. यामुळे बजेटच्या सभेला लग्नसमारंभाचे ‘रूप’ आल्याची चर्चा होती.