नृसिंहवाडीत चालू सालातील दुसरा दक्षिणव्दार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:54+5:302021-07-23T04:15:54+5:30

नृसिंहवाडी : जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांत तब्बल आठ फुटाने ...

Second Dakshinwadar ceremony of the current year at Nrusinhwadi | नृसिंहवाडीत चालू सालातील दुसरा दक्षिणव्दार सोहळा

नृसिंहवाडीत चालू सालातील दुसरा दक्षिणव्दार सोहळा

Next

नृसिंहवाडी : जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांत तब्बल आठ फुटाने वाढ झाली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी सकाळी येथील दत्त मंदिरात नदीचे पाणी शिरले. दुपारी २.३० वाजता चालू वर्षातील दुसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. या वाढलेल्या नदीच्या पाणी पातळीने कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावरील संगमेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

दत्त मंदिरात नदीचे पाणी असल्याने श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प. प. नारायण स्वामी महाराज यांचे मंदिरात ठेवण्यात आली असून, तेथे त्रिकाळ पूजा सुरु आहे. दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येथील दत्त देव संस्थानचे कर्मचारी यांनी मंदिर परिसरातील नदीकाठचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, गुरुवार आणि दक्षिणव्दार सोहळा हा योगायोग आला होता. मात्र, कोरानाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांविना हा सोहळा पार पडला.

फोटो - २२०७२०२१-जेएवाय-०८

फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील दत्त मंदिरात नदीचे पाणी आल्याने चालू सालातील दुसरा चढता दक्षिणव्दार सोहळा पार पडला. (छाया-प्रशांत कोडणीकर, नृसिंहवाडी)

Web Title: Second Dakshinwadar ceremony of the current year at Nrusinhwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.