महापालिकेतर्फे आज कोविशिल्डचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:53+5:302021-07-17T04:19:53+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर आज, शनिवारी ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर आज, शनिवारी ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना आरोग्य केंद्राकडून फोनद्वारे बोलविण्यात येईल अशा नागरिकांनीच लसीकरणा करीता उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
लसीकरणापूर्वी आरोग्य केंद्राच्या बाहेर नागरिकांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी ज्या केंद्रामध्ये नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे त्याच केंद्रामध्ये लसीकरणासाठी उपस्थित रहावे लागणार आहे.
‘कोवॅक्सिन’चे २७३२ नागरिकांचे लसीकरण
शुक्रवारी कोवॅक्सिनचा पहिला डोस २३७४ नागरिकांना तर ३५८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत १ लाख ३३ हजार ७९५ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ७० हजार ४७१ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण झाले.