विश्वास कारखान्याचा २५० प्रमाणे दुसरा हप्ता जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:38+5:302021-06-02T04:19:38+5:30

ते म्हणाले, नैसर्गिक संकट व कोरोना संसर्गामुळे २०२०-२१ हंगामामध्ये अनेक अडचणी आल्या. त्यातूनही संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ...

The second installment of Rs | विश्वास कारखान्याचा २५० प्रमाणे दुसरा हप्ता जमा

विश्वास कारखान्याचा २५० प्रमाणे दुसरा हप्ता जमा

Next

ते म्हणाले, नैसर्गिक संकट व कोरोना संसर्गामुळे २०२०-२१ हंगामामध्ये अनेक अडचणी आल्या. त्यातूनही संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, तोडणी व वाहतूकदार यांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी पार पडला. ५ लाख ८० हजार ८८३ टन ऊसाचे गाळप झाले. ६ लाख ६२ हजार १६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. १२.६५ टक्के साखर उतारा मिळाला. कोरोना महामारीत साखरेचा उठाव स्थानिक बाजारपेठेत झालेला नाही. कारखान्याने पहिली उचल प्रतिटन २ हजार ५०० प्रमाणे अदा केले आहेत. आता दुसऱ्या हप्त्यापोटी २५० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले आहेत. त्यानुसार २ हजार ७५० रुपये शेतकऱ्यांना अदा झाले आहेत. तरी येणाऱ्या हंगामकरिता सभासद, शेतकरी ऊस पुरवठादारांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे नोंद करून सहकार्य करावे, असे आवाहनही आ. नाईक यांनी केले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, कार्यकारी संचालक राम पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

Web Title: The second installment of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.