Video: श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 12:37 PM2019-07-28T12:37:31+5:302019-07-28T13:43:11+5:30

गेल्या चोवीस तासात कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत20 फूटाने वाढ 

The second South Gate Ceremony was held in Narsinhwadi | Video: श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

Video: श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

googlenewsNext

कोल्हापूर-श्री क्षेत्र नृसिंहवाडी जि.कोल्हापूर  येथील दत्त मंदिरात आज सकाळी 6:45 वाजता चालू सालातील दुसरा दक्षिण द्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिणदिशे कडे वाहते.पावसाळ्यात नदीचे पाणी वाढलेने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभार्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते.यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हंटले जाते.

यावेळी मुख्य मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडण्याऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. तसेच या सोहळ्यात स्नान केलेने मानवाच्या पापाचा ऱ्हास  होवून पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची धारणा व विश्वास असलेने या सोहळ्यात स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या संखेने हजेरी लावतात.

आषाढ महिन्यातील कामिनी एकादशी असल्याने अनेक भाविकांनी दर्शनाचा व दक्षिण द्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला.
 दक्षिणद्वार स्नान हा योगायोगच – श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करणे हा योगायोगच असतो कारण नदीचे पाणी वाढणे आणि कमी होणे हे निसर्गावर अवलंबून असून एक ते दीड फुट पाणी वाढले अथवा कमी झाले असता हा सोहळा संपतो.

पाहा व्हिडीओ -

Web Title: The second South Gate Ceremony was held in Narsinhwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.