कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय

By admin | Published: June 9, 2015 12:07 AM2015-06-09T00:07:19+5:302015-06-09T00:13:26+5:30

दहावी निकाल : दुसऱ्या स्थानी येण्याची हॅट्ट्रिक; उत्तीर्णतेत मुलींची आघाडी; विभागाचा निकाल ९५.१२ टक्के

Second in the State of Kolhapur Division | कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय

कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय

Next

कोल्हापूर : महाविद्यालयीन प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (दहावी) निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. निकालात राज्यात कोल्हापूर विभागाने सलग तिसऱ्या वर्षी दुसरे स्थान कायम राखले. विभागाचा एकत्रित निकाल ९५.१२ टक्के लागला. यात गेल्यावर्षीच्या तुलनेत १.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा ९५.५६ टक्क्यांसह विभागात अव्वल ठरला आहे. सातारा जिल्हा ९५.१९ टक्क्यांसह द्वितीय आणि सांगली जिल्हा ९४.४३ टक्क्यांनी तृतीय क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी दुपारी एक वाजता ‘आॅनलाईन’ निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष शरद गोसावी यांनी विभागाच्या निकालाची माहिती दिली. यावेळी शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, शिक्षणाधिकारी डी. बी. कुलाल, सहायक सचिव बी. एस. रोटे, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर विभागामधील २ हजार १५४ शाळांमधील एकूण १ लाख ४३ हजार ६८७ विद्यार्थ्यांनी मार्च २०१५ मध्ये ३४४ केंद्रांवरून परीक्षा दिली. त्यातील १ लाख ३६ हजार ६६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ६१ हजार ४८३ मुली असून, त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.९२ आहे. तसेच ७५ हजार १८६ मुले उत्तीर्ण झाली असून, त्यांची टक्केवारी ९४.४६ आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १.४६ टक्क्यांनी जास्त आहे. निकालात सलग दुसऱ्या वर्षी विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने यंदा प्रथम क्रमांक अबाधित राखला आहे. साताऱ्याचा द्वितीय आणि सांगलीचा तृतीय क्रमांक कायम आहे. विद्यार्थ्यांना सोमवारी, १५ जूनला दुपारी तीन वाजता शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)


सांगली जिल्ह्यात १६० शाळांचा निकाल १०० टक्के
सांगली जिल्ह्याचा निकाल ९४.४३ टक्के लागला आहे. बारावी निकालापाठोपाठ दहावीच्या निकालात देखील विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १६० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
सविस्तर वृत्त/
हॅलो पान १

विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे
गुणपत्रिकांचे वाटप : १५ जून
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत : १५ ते २५ जून
उत्तरपत्रिका छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत : २९ जून


कोल्हापूर विभागाच्या निकालात
१.२९ टक्क्यांची वाढ
विभागात सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापूर जिल्हा अव्वल
विभागातील ७२२ शाळांचा शंभर
टक्के निकाल
गैरप्रकारांबाबत ४४ जणांवर कारवाई

Web Title: Second in the State of Kolhapur Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.