दुसऱ्या लाटेत जिल्हा बँकेचे सहा कर्मचारी दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:39+5:302021-05-29T04:18:39+5:30
(जिल्हा बँकेचा लोगो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला ...
(जिल्हा बँकेचा लोगो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून, तब्बल सहा कर्मचारी कोरोनाचा संसर्ग हाेऊन दगावले आहेत. ४५ कर्मचारी बाधित झाल्याने बँक कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची भीती आहे.
कोरोनाच्या पहिल्यापेक्षा दुसरी लाट काहीसी भयंकर आहे. या लाटेचा फटका जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. थेट नागरिकांशी संपर्क येत असल्याने कर्मचारी मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. पहिल्या लाटेत शंभरहून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित झाले, त्यातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या लाटेत बाधितांबरोबरच कर्मचारी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत सहा कर्मचारी दगावले आहेत. गेल्या तीन दिवसांत दोन कर्मचाऱ्यांना मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे.
नेमून दिलेल्या दिवशीच व्यवहार
बँकेतील गर्दी टाळण्यासाठी जिल्हा बँकेच्या सर्व शाखांत दक्षता घेतली जात आहे. ग्रामीण भागात चार-पाच गावांसाठी शाखा असते. त्यामुळे एकदम ग्राहक आले तर गर्दी होईल, यासाठी आठवड्यातील दिवस गावांना दिले आहेत, त्याच दिवशी त्यांना व्यवहार करता येतो.
५० टक्केच कर्मचाऱ्यांचे लसीकरण
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांपैकी निम्या कर्मचाऱ्यांना कोविडचे लसीकरण झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी बँकेने प्रयत्न सुरु केले आहेत.
कोट-
दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सहा कर्मचारी दगावले आहेत. लसीकरणाबाबत बँक पातळीवरुन प्रयत्न सुरु असले तरी लसीच्या तुटवड्याचा अडथळा आहे.
- डॉ. ए. बी. माने (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक)