माध्यमिक शाळा आजपासून सकाळी भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:24+5:302021-03-15T04:22:24+5:30

कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा आज, सोमवारपासून सकाळी साडेसात ते दुपारी बारा या ...

Secondary school will be filled from this morning | माध्यमिक शाळा आजपासून सकाळी भरणार

माध्यमिक शाळा आजपासून सकाळी भरणार

Next

कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा आज, सोमवारपासून सकाळी साडेसात ते दुपारी बारा या वेळेत भरणार आहेत. त्याला माध्यमिक शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. त्याबाबत सर्व शाळांना माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षातील पहिल्या शैक्षणिक सत्राचे कामकाज कोरोनामुळे झाले नाही. इयत्ता नववी ते दहावीचे वर्ग दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. पाचवी ते आठवीचे वर्ग १२ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. जिल्ह्यात सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने काही शिक्षक संघटनांनी सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याडे विनंती केली होती. याची दखल घेत त्यांनी सोमवारपासून सकाळी साडेसात ते दुपारी बारा या कालावधीत माध्यमिक शाळा घेण्यास परवानगी दिली आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहेत. या वर्गाच्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचे अध्यापनाचे काम पूर्ण करणे अनिवार्य आहे. पाचवी ते नववी आणि अकरावी या वर्गाच्या सत्र दोनच्या परीक्षा शाळेने घ्यावयाच्या असल्याने या वर्गातील सर्व विषयांचा शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यासाठी सकाळच्या सत्रात स्थानिक परिस्थितीस अनुसरून अध्यापनाच्या कामाचे तास वाढविण्यास हरकत नाही. कोरोनाबाबतच्या सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन करून शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी लोहार यांनी माध्यमिक शाळांना केली आहे.

चौकट

माध्यमिक शाळांची नवीन वेळ

सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : १०५०

विद्यार्थी संख्या : २ लाख ५० हजार

चौकट

कारवाईचा इशारा

अभ्यासक्रम अपूर्ण राहिल्यास आणि तक्रार प्राप्त झाल्यास आपणाविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या पत्राद्वारे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे.

Web Title: Secondary school will be filled from this morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.