‘कनवा’मध्ये शनिवारपासून विभागीय साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 04:04 PM2019-12-12T16:04:48+5:302019-12-12T16:07:07+5:30
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, करवीरनगर वाचन मंदिर (कनवा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) दुसरे विभागीय साहित्य संमेलन कोल्हापुरात होणार आहे. कनवाच्या विश्वनाथ पार्वती गोखले सभागृहातील संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, तर स्वागताअध्यक्ष उद्योजिका अनिता जनवाडकर आहेत. संमेलनात सोशल मिडिया व साहित्य याविषयावर परिसंवाद होणार आहे, अशी माहिती कनवाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी आणि कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, करवीरनगर वाचन मंदिर (कनवा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) दुसरे विभागीय साहित्य संमेलन कोल्हापुरात होणार आहे. कनवाच्या विश्वनाथ पार्वती गोखले सभागृहातील संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, तर स्वागताअध्यक्ष उद्योजिका अनिता जनवाडकर आहेत. संमेलनात सोशल मिडिया व साहित्य याविषयावर परिसंवाद होणार आहे, अशी माहिती कनवाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी आणि कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
नंदकुमार जोशी म्हणाले, या संमेलनाचे उदघाटन शनिवारी सायंकाळी पाच वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित असतील.
उदघाटनानंतर सात वाजता कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक अरविंद देशपांडे असतील. सतीश कुलकर्णी म्हणाले, संमेलनाचा समारोप रविवारी दुपारी चार वाजता भाजपचे महानगरजिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, कुमुदिनी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
यावेळी स्वयंसिद्धाचे संचालिका कांचनताई परुळेकर, श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे यांचा सत्कार केला जाणार आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, संजीवनी तोफखाने, अश्विनी वळीवडेकर, अनिल वेल्हाळ, उदय सांगवडेकर, दीपक गाडवे, मनिषा शेणई उपस्थित होत्या.
संमेलनात रविवारी
- सकाळी ९.३० वाजता. : अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीचे अभिवाचन (डॉ. हिमांशू स्मार्त)
- सकाळी १०.३० वाजता :सोशल मीडिया व साहित्य याविषयावर परिसंवाद (विनय गुप्ते, विनायक पाचलग)
- दुपारी २ वाजता : कथाकथन (विकास कुलकर्णी, हेमा गंगातीरकर)