मालगाडीतून पुणे ते बेळगाव काय आणल पहा.. तुम्हीही थक्क व्हाल... हे फक्त इथंच घडू शकत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 04:39 PM2020-04-23T16:39:13+5:302020-04-23T16:44:15+5:30

एका बाजूला सरकारचे आदेश, निर्बंध, लॉकडाऊन, रस्ता मार्ग व वाहतूक बंद असतानाही अखेर माणुसकी व नियमांचे उल्लंघन न करता अंगडी यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधत काही मदत करता येईल का यासाठी अंगडी यानी विशेष प्रयत्न केले.

See what you can bring from Pune to Belgaum by freight train .. You too will be amazed ... This can only happen here .. | मालगाडीतून पुणे ते बेळगाव काय आणल पहा.. तुम्हीही थक्क व्हाल... हे फक्त इथंच घडू शकत..

मालगाडीतून पुणे ते बेळगाव काय आणल पहा.. तुम्हीही थक्क व्हाल... हे फक्त इथंच घडू शकत..

googlenewsNext

बेळगाव : बेळगावमधील टिळकवाडी येथील एका पाच वर्षाच्या मुलासाठी चक्क रेल्वे यंत्रणा धावली. त्यांनी मुलाच्या आरोग्यासाठी त्याला आवश्यक असलेले औषध आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने थेट मालगाडीचा वापर करत, माणुसकी व लॉकडाऊन असला तरी आधी प्रांत नव्हे तर माणुसकी महत्वाची, संबंधिताचा जीव मौल्यवान आहे हेच दाखवून दिले.

याविषयी आगळीवेगळी माहिती अशी की, एका पाचवर्षीय मुलावर पुणे येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे उपचार सुरु आहेत. साहजिकच त्यावर देण्यात आलेले औषध ही पुण्यातच मिळणार अशी परिस्थिती निर्माण झालेली. त्यामुळे त्या मुलाच्या पालकांनी बेळगाव व महाराष्ट्रातील सरकारकडे पुण्याला जाऊन औषध आणण्याची रितसर परवानगी मागितली. परंतु दोन्ही सरकारी ही परवानगी मान्य केली नाही. त्यामुळे मदत मिळण्यास अडचण येणार होती. ३ तारखेपर्यंत लॉकडाऊन असल्याने व कडक निर्बंध दोन्ही सरकारने घातल्याने ते औषध या ठिकाणी मिळत नव्हते. त्यामुळे या पालकांवर मोठे संकट आले. अशावेळी पालकांनी बेळगावचे खासदार व रेल्वेमंत्री सुरेश अंगडी याांन आपली व्यथा सांगितली.

एका बाजूला सरकारचे आदेश, निर्बंध, लॉकडाऊन, रस्ता मार्ग व वाहतूक बंद असतानाही अखेर माणुसकी व नियमांचे उल्लंघन न करता अंगडी यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधत काही मदत करता येईल का यासाठी अंगडी यानी विशेष प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले व थेट मालगाडीच्या माध्यमातून त्या चिमुकल्या पाचवर्षीय मुलाचे औषध पोहोचण्यास मदत मिळाली. यानंतर मात्र पालकांनी सुटकेचा निश्वा:स टाकला. या घटनेवरून प्रशासन व मंत्री यांच्याकडे असलेली कार्यतत्परता, मदतीची भावना दिसून आली.

 

 

Web Title: See what you can bring from Pune to Belgaum by freight train .. You too will be amazed ... This can only happen here ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.