संकेश्वर पालिकेच्या नगराध्यक्षपदी सीमा हतनुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:40 PM2020-10-27T19:40:14+5:302020-10-27T19:42:03+5:30
Muncipal Corporation, Karnatak, belgaon , kolhapur संकेश्वर नगरपालिकेच्या दहाव्या नूतन नगराध्यक्षपदी सीमा श्रीकांत हतनुरे यांची तर उपाध्यक्षपदी अजित अशोक करजगी निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी अशोक गुरानी यांनी केली. पालिकेच्या अपक्षाच्या मदारीवर भाजपाचा झेंडा फडकविला आहे.
संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेच्या दहाव्या नूतन नगराध्यक्षपदी सीमा श्रीकांत हतनुरे यांची तर उपाध्यक्षपदी अजित अशोक करजगी निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी अशोक गुरानी यांनी केली. पालिकेच्या अपक्षाच्या मदारीवर भाजपाचा झेंडा फडकविला आहे.
नगराध्यक्षपदासाठी हतनुरे (भाजप) व शेवंता कब्बुरी (काँगे्रस) तर उपनगराध्यक्षपदी अजित करजगी (अपक्ष) व डॉ. जयप्रकाश करजगी (काँग्रेस)तर्फे अर्ज दाखल केले.
पालिकेत ११ काँगे्रस, ११ भाजप, १ अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. दरम्यान भाजप उमेदवाराला १४ मते मिळाली तर काँगे्रसला ११ मते मिळाली. यामध्ये विशेषत: आमदार/ खासदारांचे मते ग्राह्य धरत असल्याने ती मते भाजपच्या पारड्यात पडली.
कर्नाटकात २ सप्टेंबर २०१८ ला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्याने पण अध्यक्ष, उपाध्यक्ष पदास राज्यात आरक्षण न्याय प्रविष्ठ बनल्याने लोकप्रतिनिधीव्यतिरिक्त २५ महिने सभागृह रिकामे असल्याने प्रशासकीय कामकाज सुरू होते. अखेर या निवडणुकीने तो खुला झाला.
काँगे्रसतर्फे व्हीप लागू केल्याने त्याची ११ मते फुटली नाहीत. निवडणुकीत उपनगराध्यक्षपदासाठी पुतण्या अजित करजगी (अपक्ष) यांनी आपले काका डॉ. जयप्रकाश करजगी (काँगे्रस) यांचा पराभव केला. निवडीनंतर नगराध्यक्षा हतनुरे म्हणाल्या, नागरी समस्या सोडविण्यासाठी मूलभूत सवलती नागरिकांना देण्याचा मानस आहे. आमदार उमेश कत्ती यांच्या सहकार्याने सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून स्वच्छ व सुंदर संकेश्वर बनविणार आहे.
निवडणूक निकाल घोषित होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. नगराध्यक्षा हतनुरे यांचे माहेर कोल्हापूर असून त्या व्ही. व्ही. गाडगीळ यांच्या कन्या आहेत. उपनगराध्यक्ष करजगी हे माजी नगरसेवक अशोक करजगी यांचे सुपूत्र आहेत. यावेळी खासदार आण्णासाहेब ज्वोले व आमदार उमेश कत्ती यांच्यासह समर्थक उपस्थित होते.