अशोकराव माने इन्स्टिट्युटच्या २०६ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:25 AM2021-01-03T04:25:23+5:302021-01-03T04:25:23+5:30
खोची : वाठार (ता. हातकणंगले) येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील २०६ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतीतून निवड ...
खोची : वाठार (ता. हातकणंगले) येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील २०६ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही माने इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केल्याची माहिती संस्थाध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली.
टीसीएस, इन्फोसिस, कमिन्स, एमफासिस, इन यंत्रा अशा विविध कंपन्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून माने इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांची निवड केली. या कॅम्पस मुलाखतीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आशिष मानकर, अभिजीत चौगुले, सूर्यकांत सावंत, अक्षय बागणे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. विजयसिंह माने यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या मनिषा माने यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी संचालक प्रवीण घेवारी, प्रा. अजय मस्के, प्रा. हणमंत शेटे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी - वाठार येथील अशोकराव माने इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा सत्कार विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रवीण घेवारी, हणमंत शेटे, अजय मस्के उपस्थित होते.