दत्त पॉलिटेक्निकच्या ३० विद्यार्थ्यांची निवड;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:28+5:302021-09-02T04:50:28+5:30
शिरोळ : येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून टी. ई. कनेक्टिविटी व कॉसमा इंटरनॅशनल, पुणे ...
शिरोळ : येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून टी. ई. कनेक्टिविटी व कॉसमा इंटरनॅशनल, पुणे या कंपनीमध्ये निवड झाली आहे, अशी माहिती दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, दत्तमधील विद्यार्थ्यांनी निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली असून, कॉलेजने विद्यार्थ्यांना राज्य, देश व विदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी अनेक कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. मेकॅनिकल विभागांमधील ५, इलेक्ट्रिकलमधील १८, तर कॉम्प्युटर विभागातील ७ अशा एकूण ३० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश नोंदणी सुविधा केंद्र कॉलेजमध्ये सुरू झाले असून, विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य प्रेमसागर पाटील यांनी केले. याप्रसंगी अरविंद महंत, पांडुरंग डोके, चैतन्य भाट, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, सचिन शिंदे, उपप्राचार्य प्रा. निळकंठ भोळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
फोटो - ०१०९२०२१-जेएवाय-०१-गणपतराव पाटील