‘शरद’च्या ३० विद्यार्थ्यांची झेडएफ स्टिअरिंग कंपनीत निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:32+5:302020-12-12T04:40:32+5:30

मेकॅनिकलमधील राहुल पाटील, कर्मवीर देमाण्णा, पार्थ पाटील, साहिल मुल्ला, सौरभ खोत, चेतन चौगुले, ऋषीकेश कुंभार, आदेश कारंडे, जॉर्ज डिसूजा, ...

Selection of 30 students of 'Sharad' in ZF Steering Company | ‘शरद’च्या ३० विद्यार्थ्यांची झेडएफ स्टिअरिंग कंपनीत निवड

‘शरद’च्या ३० विद्यार्थ्यांची झेडएफ स्टिअरिंग कंपनीत निवड

Next

मेकॅनिकलमधील राहुल पाटील, कर्मवीर देमाण्णा, पार्थ पाटील, साहिल मुल्ला, सौरभ खोत, चेतन चौगुले, ऋषीकेश कुंभार, आदेश कारंडे, जॉर्ज डिसूजा, सुनीलकुमार वैष्णव, प्रणव पवार, अनिकेत बोरगावे, ओंकार चव्हाण, अभिषेक जगताप, ओंकार बडवे, वैभव खोत, शुभम धर्मण्णावर, शुभम नागराळे, शोहेब शेख, अनिल बाबर, दत्ता चेचर, शहानवाज नाईकवडे, मयूरेश कोरे, वैभव मगदूम, संतोष पाटील, तौसिफ नवलगी, दिग्विजय मगदूम, राहुल सुरपुसे, सौरभ चौगुले, विजय देशमुख या विद्यार्थिनींची निवड झाली आहे.

झेडएफ स्टिअरिंग ही जर्मन कंपनी आहे. जगातील ४१ देशांत कंपनाचा विस्तार आहे. जगात स्टिअरिंग सिस्टीम उत्पादनात ही कंपनी अग्रेसर आहे. कंपनी मर्सिडिझ-बेंझ, जनरल मोटर्स, टाटा मोटर्स, महिंद्रा ट्रक्स ॲण्ड बस, फोर्स मोटर्स, आदी नामांकित कंपन्यासाठी पुरवठा करते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. अमित चौगुले, प्रा. अभिजित केकरे, प्रा. नेहा सोनी यांच्यासह सर्व डीन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Selection of 30 students of 'Sharad' in ZF Steering Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.