दत्त पॉलिटेक्निकच्या ५ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:50+5:302021-07-22T04:15:50+5:30
शिरोळ : येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीस लावण्याची परंपरा ...
शिरोळ : येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीस लावण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे. संस्थेच्या मोसिन मस्तोळे व प्रथमेश कुंभार या विद्यार्थ्यांची मॅग्ना ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झाली आहे. तसेच सानिका पाटील, स्वप्नाली कुरले व क्षितिजा पाटील या विद्यार्थिनींची बजाज आटो या कंपनीमध्ये निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, कॉलेजने विद्यार्थ्यांना राज्य, देश व विदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी गुणवत्तेमध्ये व कॅम्पस सिलेक्शनमध्ये कॉलेजने मोठे यश संपादन केले आहे. कॉलेजमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच सर्व विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच विविध कंपन्यांच्या गरजेनुसार लागणारे सॉफ्ट स्किल, अप्टिट्यूड टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यूव, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आदी विषयांचे प्रशिक्षण आणि अनेक उद्योजकांचे अनुभव व मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थी सर्व प्रकारे नव्या आव्हानासाठी तयार व्हावा यासाठी कॉलेजचे प्रयत्न नेहमीच राहतील, असेही पाटील यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश नोंदणी सुविधा केंद्र कॉलेजमध्ये सुरू झाले असून, प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी कॉलेजशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य प्रेमसागर पाटील यांनी केले.
या वेळी एक्स ऑफिसिओ ट्रस्टी एम. व्ही. पाटील, अशोक शिंदे, सचिन शिंदे, उपप्राचार्य प्रा. निळकंठ भोळे, तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.