डीकेटीईच्या ५८ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:28+5:302021-09-04T04:27:28+5:30
इचलकरंजी : कॅपजेमिनी (फ्रान्स) ने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये येथील डीकेटीई इंजिनिअरिंग विभागातील ५८ विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या ...
इचलकरंजी : कॅपजेमिनी (फ्रान्स) ने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये येथील डीकेटीई इंजिनिअरिंग विभागातील ५८ विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३.८ लाख इतके पॅकेज देण्यात आले आहे. सध्या नोकरीच्या क्षेत्रात आयटी कंपन्यांचा दबदबा असून, इंजिनिअरिंग क्षेत्रात स्पर्धा असल्याकारणाने हे यश मोठे मानले जात आहे.
कॅपजेमिनी ही फ्रान्सस्थित नामांकित सॉफ्टवेअरनिर्मिती कंपनी असून, जगभरात अनेक देशांमध्ये कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. पुणे येथील कार्यरत असणाऱ्या या कंपनीच्या माध्यमातून डीकेटीईच्या ५८ विद्यार्थ्यांची निवड केली. डीकेटीईकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्र व कंपन्यांमधील आजची गरज आणि आवश्यकता याची जाणीव करून देण्यासाठी विविध नामांकित कंपन्यांतील मान्यवरांची मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, आर. व्ही. केतकर, मानद सचिव सपना आवाडे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. जी. एस. जोशी डॉ. यु. जे. पाटील, प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी
०३०९२०२१-आयसीएच-०३
कॅपजेमिनी या कंपनीमध्ये इचलकरंजीतील डीकेटीई इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.