तळसंदे डीवायपी कृषी अभियांत्रिकीच्या ६५ विद्यार्थ्यांची पदव्युत्तरसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:26+5:302021-01-22T04:23:26+5:30
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या ...
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या ६५ विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या १८ विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली. यामध्ये कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे १८ तर कृषी महाविद्यालयाच्या ४७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आयआयटी खरगपूर, पश्चिम बंगाल १, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, सोनिपत, हरियाणा - २, श्रीवेंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदोर, भोपाळ - ४, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी - २०, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला - ३, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी - ६, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली - ५, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाब - ४, प्रोफेसर जयशंकर तेलंगणा स्टेट ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, हैदराबाद - २, टेक्सास ए ॲण्ड एम युनिव्हर्सिटी, अमेरिका - १, साम हिंगणबॉटम युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर टेक्नोलॉजी ॲण्ड सायन्स, अलाहाबाद, उत्तर प्रदेश - ३, इन्स्टिट्यूट रूरल मॅनेजमेंट, आनंद, गुजरात - १, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, पुणे - २, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, सांगली - २, पुण्यातील भारती विद्यापीठ, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस स्टडीज, डी. वाय. पाटील विद्यापीठ व ग्लोबल बिझनेस स्कूल ॲण्ड रिसर्च सेंटर येथे प्रत्येकी १ तर लोटस बिझनेस स्कूल, पुणे येथे ६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार, प्रा. पी. डी. उके, प्रा. आर. आर. पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे, प्रा. उमेश मोहिते, प्रा. एस. आर. सूर्यवंशी, प्रा. के. आर. पोवार, डॉ. आर. व्ही. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.