डीकेटीईच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांची हॉफ युनिव्हर्सिटीमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:23 AM2021-09-13T04:23:52+5:302021-09-13T04:23:52+5:30
इचलकरंजी : डीकेटीईमधून डिप्लोमा इन टेक्स्टाइल मॅन्युफॅक्चरिंग ही पदविका कोर्स पूर्ण केलेल्या तीन विद्यार्थ्यांना हॉफ युनिव्हर्सिटी (जर्मनी) येथे उच्च ...
इचलकरंजी : डीकेटीईमधून डिप्लोमा इन टेक्स्टाइल मॅन्युफॅक्चरिंग ही पदविका कोर्स पूर्ण केलेल्या तीन विद्यार्थ्यांना हॉफ युनिव्हर्सिटी (जर्मनी) येथे उच्च शिक्षण संपादन करण्याची संधी मिळाली आहे. आदित्य स्वप्नील आवाडे, केशव ओमप्रकाश पारीख व यश महाबीरप्रसाद झंवर हे विद्यार्थी सप्टेंबर २०२१ मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचे पदवी शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला रवाना होत आहेत.
हॉफ युनिव्हर्सिटीने डीकेटीईमधील टेक्स्टाइल पदविकेच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला मान्यता देत विद्यार्थ्यांना जर्मनी येथे ‘इनोव्हेटिव्ह टेक्स्टाइल’ या पदवीच्या थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स्ड रिसर्च लॅबोरेटरीज, ॲडव्हान्स्ड टेक्स्टाइल प्रॉडक्शनचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळेल.
डीकेटीई इन्स्टिट्यूटचा परदेशातील २५ हून अधिक विद्यापीठांशी सामंजस्य करार आहे. या विद्यापीठांमध्ये शिक्षण आणि संशोधन याबाबत आदान-प्रदान करण्यात आले. हॉफ युनिव्हर्सिटी, जर्मनी यांच्याबरोबर झालेल्या करारांतर्गत या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव सपना आवाडे, आर.व्ही. केतकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.पी.व्ही. कडोले, प्रा.डॉ.यू.जे. पाटील, प्रा. एस.ए. शेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी
१२०९२०२१-आयसीएच-०१
डीकेटीई डिप्लोमामधील विद्यार्थ्यांची हॉफ युनिव्हर्सिटी (जर्मनी) येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.