डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी परदेशात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:50 AM2020-12-05T04:50:02+5:302020-12-05T04:50:02+5:30
समर्थ गायकवाड याची एमएस इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी टेक्सास टेक युनिव्हर्सिटी अमेरिका, सौरभ मुमताज याची मास्टर्स पोग्रॅम इन रोबोटिक्ससाठी युनिव्हर्सिटी वेस्ट ...
समर्थ गायकवाड याची एमएस इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी टेक्सास टेक युनिव्हर्सिटी अमेरिका, सौरभ मुमताज याची मास्टर्स पोग्रॅम इन रोबोटिक्ससाठी युनिव्हर्सिटी वेस्ट स्विडन, तन्मय कुरकुटे याची एमएससी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगसाठी आर.डब्ल्यू.टी.एच.आकेन युनिव्हर्सिटी जर्मनी येथे निवड झाली आहे.
या परीक्षेत यश मिळविण्यासाठी डीकेटीईमध्ये करिअर गायडन्स सेलमार्फत जर्मन लॅँग्वेज क्लासेस, विविध तज्ज्ञांचे लेक्चरचे आयोजन केले होते. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, आर. व्ही. केतकर यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. डॉ. व्ही. आर. नाईक, प्रा. बी. बी. कबनुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
(फोटो ओळी)
०२१२२०२०-आयसीएच-०२
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षणासाठी निवड झाली.