डीवायपी अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:09+5:302021-03-13T04:46:09+5:30

कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नोलॉजी महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची एससीजी डिजाईन सोल्युशन्स,पुणे ...

Selection of four students of DYP Engineering | डीवायपी अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांची निवड

डीवायपी अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांची निवड

Next

कसबा बावडा :

येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नोलॉजी महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची एससीजी डिजाईन सोल्युशन्स,पुणे कंपनीमध्ये निवड झाली आहे. कंपनीतर्फे झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे ही निवड करण्यात आल्याचे टीपीओ प्रा. सुदर्शन सुतार यांनी सांगितले.

महाविद्यालयाच्या बी. ई. सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी तेजन कुमठेकर, सिद्धार्थ दिवटे, सोहेल नदाफ आणि समद मनेर यांची ज्युनिअर इंटर्न म्हणून निवड झालेली आहे.

या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता डॉ. क्षमा कुळहळ्ळी, टीपीओ प्रा. सुदर्शन सुतार, प्रा.अभय जोशी, प्रा.अजीम सुतार, प्रा.विजय आवटी आणि प्रा. अमित पाटील आदी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Selection of four students of DYP Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.