कोलंबिया विद्यापीठात संशोधनासाठी रोहन घाटगे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:49+5:302021-08-19T04:28:49+5:30
कोल्हापूर : येथील रोहन संदीप घाटगे यांची न्यूयॉर्क येथील प्रथम दर्जाची आयव्ही लीग कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ...
कोल्हापूर : येथील रोहन संदीप घाटगे यांची न्यूयॉर्क येथील प्रथम दर्जाची आयव्ही लीग कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. ‘कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग मॅनेजमेंट ॲण्ड रिअल इस्टेट डेव्ह्लपमेंट’ या अभ्यासक्रमासाठी घाटगे यांची निवड झाली असून, अशी संधी मिळणे हा गुणवत्तेचा बहुमान समजला जातो.
रोहन घाटगे यांचे अभियांत्रिकीमधील पदविका शिक्षण कोल्हापूर येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये झाले. या पदविकेमध्ये त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला होता. मुंबईमधील लोकल ट्रेनच्या पावसाळ्यामध्ये विस्कळीत होणाऱ्या वाहतुकीवर उपाय म्हणून ‘ओव्हरहेड कन्व्हेनर बेल्ट सिस्टीम’चे संशोधन त्यांनी केले आहे. त्याला व्हीजेटीआयचा पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापूर येथील ‘जयंती नाल्याचे पुनरुज्जीवन’ या विषयावर संशोधनपर प्रबंध तयार करून तो कोल्हापूर येथील असोसिएशन ऑफ अर्किटेक्टस् ॲण्ड इंजिनिअर्स व क्रीडाई कोल्हापूरकडे सादर केला आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी येथील पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमात ‘पिझोइलेक्ट्रिक रोड्स’ आणि ‘कार्बन क्रेडिट काॅंक्रिट वॉल्स’ हे त्यांचे भविष्यातील अभ्यास विषय राहणार आहेत. रोहन घाटगे हे असोसिएशन ऑफ अर्किटेक्टस् ॲण्ड इंजिनिअर्स या संस्थेचे आजीव सभासद आहेत.
फोटो : १८०८२०२१-कोल-रोहन घाटगे-निवड