हेरले उपसरपंचपदी सतीश काशीद यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:52+5:302021-03-17T04:24:52+5:30
हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथील नूतन उपसरपंचपदी सतीश संभाजी काशीद यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच आश्विनी चौगुले ...
हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथील नूतन उपसरपंचपदी सतीश संभाजी काशीद यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच आश्विनी चौगुले होत्या.
स्वाभिमानी गावविकास आघाडीअंतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच राहुल शेटे यांनी राजीनामा दिला; त्यामुळे उपसरपंचांची निवड घेण्यात आली. मंगळवारी उपसरपंच पदाकरिता स्वाभिमानी गावविकास आघाडीकडून सतीश काशीद यांनी अर्ज दाखल केला; तर विरोधी आघाडीकडून आदिक इनामदार यांनी अर्ज दाखल केला.
अर्ज माघारीच्या मुदतीत माघार न झाल्याने उपसरपंच पदाकरिता निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सतीश काशीद यांना १४ व आदिक इनामदार यांना ४ मते मिळाली. यामध्ये सतीश काशीद विजयी झाल्याची घोषणा सरपंच आश्विनी चौगुले यांनी केली.
निवडीनंतर स्वाभिमानी गावविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली.
यावेळी आघाडीचे नेते राजेश पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. पद्माराणी पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुल शेटे, विजय भोसले, आशा उलसार, अपर्णा भोसले, विजया घेवारी, शोभा खोत, स्वरूपा पाटील, मजिद लोखंडे, रिजवाणा पेंढारी, फरीद नायकवडी, मीना कोळेकर, निलोफर खतीब, बथुवेल कदम, शरद आलमान, आरती कुरणे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण उपस्थित होते.