‘केआयटी’च्या सहा विद्यार्थ्यांची मॅन ट्रक कंपनीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:37+5:302021-09-08T04:30:37+5:30
या निवडीबाबतचा निकाल महाविद्यालयाला नुकताच प्राप्त झाल्याची माहिती ‘केआयटी’च्या व्यवस्थापनाने दिली. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑनलाइन तांत्रिक परीक्षा आणि मुलाखत ...
या निवडीबाबतचा निकाल महाविद्यालयाला नुकताच प्राप्त झाल्याची माहिती ‘केआयटी’च्या व्यवस्थापनाने दिली. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑनलाइन तांत्रिक परीक्षा आणि मुलाखत घेऊन या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असून या काळामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी चार लाखांचे पॅकेज मिळणार आहे. निवडीसाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. अमित सरकार, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. उदय भापकर, ई अँड टीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. नितीन सांबरे, प्रा. अतुल निगवेकर यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (०७०९२०२१-कोल-स्मितल पाटील (केआयटी), ऋतुजा डवरी (केआयटी), ऋतुजा नाईक (केआयटी), शीतल कपाले (केआयटी), अमेय आसगावकर (केआयटी), सुमंत महाराज (केआयटी)