शोकराव माने फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:05+5:302021-09-07T04:31:05+5:30
विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी कॉलेजमध्ये अग्रक्रम दिला जातो, असे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ...
विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी कॉलेजमध्ये अग्रक्रम दिला जातो, असे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी सांगितले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. पी. एस. पाटील व सहायक समन्वयक एन. डी. देसाई यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूकरिता परिश्रम घेतले. याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा. विजयसिंह माने, कोल्हापूर जि. प. सदस्या मनीषा माने, प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
फोटो ओळी-अशोकराव माने फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निवडीबद्दल विजयसिंह माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मनीषा माने, डॉ. पी. एस. पाटील, डॉ.शुभांगी सुतार, प्रा.अवधूत जाधव आदी उपस्थित होते.