‘मैत्रेय’ची मालमत्ता विकून पैसे देऊ; गुंतवणूकदारांना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:18 AM2018-10-06T00:18:38+5:302018-10-06T00:18:43+5:30
कोल्हापूर : दुप्पट व्याजाचे आमिष दाखवून देशभरातील गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या वसई-मुंबई येथील मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीची राज्यभरातील मालमत्ता शासनाने जप्त केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ही मालमत्ता लिलावामध्ये विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे लवकर परत करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केला जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळास शुक्रवारी दिली.
गृहराज्यमंत्री केसरकर हे शुक्रवारी कोल्हापूर दौºयावर आले असताना आॅल इंडिया मैत्रेय उपभोक्ता असोसिएशन या गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळाने त्यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये विनायक चव्हाण, दत्तात्रय श्ािंगाडे, नीलेश वाणी यांच्यासह महिला गुंतवणूकदारांनी आपली मते मांडली. वसई येथील मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीच्या अध्यक्षा वर्षा सकपाळकर व संचालकांनी दुप्पट व्याजाचे आमिष दाखवून सामान्य लोकांकडून दोन हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत रक्कम भरून घेतली.
सुमारे १३ राज्यात या कंपनीचा विस्तार असल्याने लोकांनी गुंतवणूक केली. २०१५ पासून या कंपनीने आपला गाशा गुंडाळून सुमारे २८ हजार कोटींचा अपहार केला. सांगली जिल्ह्यातून ८९ कोटींची, तर कोल्हापुरातून ३० कोटींची गुंतवणूक झाली आहे. या कंपनीविरोधात नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. कंपनीची सांगलीतील ३९ कोटी रकमेची मालमत्ता शासनाने जप्त केली आहे. शासनाने या मालमत्ता विकून आम्हाला पैसे परत करावे, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली. त्यावर मंत्री केसरकर यांनी सांगितले की, देशभरातून या कंपनीविरोधात फिर्यादी दाखल झाल्या आहेत. महाराष्टÑातही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. राज्य शासनाने या कंपनीच्या काही मालमत्ता जप्त केल्या आहेत. या अपहार प्रकरणावर मुंबईचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार खत्री यांची प्राधिकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.